‘केवायसी’साठी बँक खात्याला आधार जोडणे आवश्यक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 23, 2018

‘केवायसी’साठी बँक खात्याला आधार जोडणे आवश्यक

मुंबई ः बँक ग्राहकांना आपल्या खात्याशी बँकेत जाऊन आधार क्रमांक आणि ’केवायसी’ कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दिले आहेत. सरकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून सुनावणीनंतर यावर निर्णय होणार आहे.  रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रात्री एक परिपत्रक प्रसिद्ध करून केवायसीसंदर्भात माहिती दिली. बँकेच्या ग्राहकांना आधी एक फोटो, पॅन कार्डची कॉपी तसेच घराचा कायमस्वरूपी पत्ता असा केवायसीसाठी पुरावा आवश्यक होता. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या संशोधित दिशानिर्देशानुसार, केवायसीचा अर्ज करण्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीनं आधार क्रमांक आणि पॅन कार्ड किंवा फॉर्म ६० मिळवणे गरजेचे राहणार आहे. बँकींग सेवेला वातावरण पोषक व्हावे यासाठी हे रिझर्व्हबँकेने पाऊल उचलले आहे, आहे असे सूत्रांनी सांगितले. जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयमधील लोकांना हे सध्या तरी बंधनकारक करण्यात आले नाही. त्यांच्याकडून कायमस्वरूपी पत्त्यासाठी ओव्हीडी आणि फोटो घेतला तरी चालेल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. जे लोक भारतीय नाहीत किंवा आधारसाठी पात्र नाहीत त्यांना सुद्धा आधारसक्ती नको, असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages