सोलापूर (प्रतिनिधी)ः लोकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. या अपेक्षांची पुर्तता करताना अधिकारी व कर्मचार्यांनी संवेदनशीलपणे तसेच स्वयंप्रेरणेने काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि माहिती अधिकार कायदा तज्ज्ञ शिवाजी पवार आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, सध्या नागरिकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्यांना वाट पहायला आवडत नाही. सेवा झटपट मिळावी अशी अपेक्षा आहे.नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतानाच विविध दबावगटांनाही तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत लोकांना सेवा देण्यासाठी प्राधान्य द्यावे लागणार आहे. यासाठी संवेदनशील पध्दतीने काम करायला हवे. पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले, नागरिकांना सेवा लवकरात लवकर हवी असते. त्यामुळे शासकीय अधिकार्यांनी स्वतःच्या कामाच्या पद्धतीत आवश्यक ते बदल करायला हवेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी नागरी सेवेबाबत आणि नागरी सेवा दिन साजरा करण्यापाठी मागील उद्देश सांगितला. अधिकारी आणि कर्मचारी यांना काम करताना विविध मर्यादा पाळून काम करावे लागते. मात्र या मर्यादा पाळताना सदसद्विवेकबुद्धी कायम ठेवावी लागते. लोकांच्या हिताचे निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी पडू नये, असे डॉ. भारूड म्हणाले.यावेळी श्री. शिवाजी पवार यांनी माहिती अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर उल्लेखनीय कामगिरी करणार्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0 Comments