Hot Posts

6/recent/ticker-posts

पांडुरंग कारखान्यास ऊर्जा संवर्धनाचा पुरस्कार जाहीर

पंढरपूर (प्रतिनिधी)ः श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास महाराष्ट्र ऊर्जा विकास विभागाचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे वितरण २७ एप्रिल रोजी केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग यांच्या हस्ते, राज्याचे अन्न व औषधमंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत पुणे येथे होणार आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली चालणार्‍या पांडुरंग साखर कारखान्यास आजपर्यंत २८ पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आता नव्या राज्यस्तरीय पुरस्काराची भर पडली आहे. सहकारी क्षेत्रातील जी कारखाने अडीच लाख युनिट विजेचा वापर करतात, त्या कारखान्यांना या पुरस्कार योजनेमध्ये भाग घेता येतो. या पुरस्कार योजनेमध्ये महाराष्ट्र ऊर्जा विकास विभागाकडून ऊर्जा संवर्धन या विषयांवर प्रश्‍नावली नियमित केली होती. या प्रश्‍नावलीची उत्तरे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सादर केली. प्रश्‍नावलीसोबत कारखान्याचा वार्षिक अहवालही सादर केला होता. सदर अहवालाचा व प्रश्‍नावलीचा महाराष्ट्र ऊर्जा विकास विभागाच्या न्याय समितीकडून अभ्यास करुन या पुरस्कारासाठी नामांकन केले आहे. या पुरस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी पांडुरंग कारखान्यामध्ये ऊर्जा संवर्धन समितीची स्थापना केली आहे. या समितीची ध्येय व धोरणे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.
या अंतर्गत ऊर्जा वापराचा लेखापरिक्षण अहवाल करणे, कामगारांना ऊर्जा संवर्धनास प्रोत्साहित करणे, प्रकल्पाचे तांत्रिक व अर्थिक विश्‍लेषण करणे, दैनिक ऊर्जा वापर व संवर्धन याची देखरेख करणे आदी सहा बाबींचा समावेश आहे.या ऊर्जा संवर्धनामुळे २०१५-१६ मध्ये ८ लाख ६५ हजार १४२ एवढ्या युनिटसह बारा लाख रुपयांची तसेच २०१६-१७ मध्ये २३ लाख ५० हजार ७१३युनिटसह ४४ लाख रुपयांची बचत झाली आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments