
सुधारणावादी बदलांमुळे भारतात सोन्याची मागणी घटली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे आणि त्याच्या विविध परिणामांमुळे सोन्याची रोख खरेदी घसरली आहे. भारतात गेले कित्येक वर्षे सोन्याची खरेदी ही प्रामुख्याने रोखीमध्ये होते. सुधारणावादी उपाययोजांमुळे रोख खरेदीवरील निर्बंधांमुळे बहुतांश बचत सोने अथवा स्थावर मालमत्ता खरेदीऐवजी प्रामुख्याने भांडवली बाजाराकडे वळले आहेत. भारतातील सोन्याची मागणी ७५० टन राहाण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतातील सोन्याची मागणी वार्षिक आठशे ते नऊशे टन राहिली आहे. विविध बदलांच्या घटकांमध्ये वस्तू व सेवा करप्रणाली लागू केल्यामुळे सराफ बाजारावर त्याचा मोठा परिणाम झाला. ही करप्रणाली अजून नागरिकांच्या अंगवळणी पडायची असल्याने सोन्याच्या खरेदीत घट झालेली आहे. सोन्याच्या दरातील वाढीबाबत सकारात्मक अंदाज कायम आहे. २०१७ मध्ये सोन्याच्या मागणीने किमान पातळी गाठल्याने निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सोने दरात वाढीसाठी आशादायक वातावरण यापुढे राहाणार आहे. भारतीय बाजारपेठेचा विचार करता यंदाच्या वर्षात दहा ग्रॅमला २८.८०० ते २९,३०० ही आधारभूत पातळी असून ३२,५०० ते ३३,००० रुपयांच्या पातळीपर्यंत सोन्याचे दर उसळू शकतात.
0 Comments