Hot Posts

6/recent/ticker-posts

दुष्काळाला लढा देण्यासाठी विठ्ठलवाडीकरांच्या साथीला रणजितसिंहांची टीम

माढा (प्रतिनिधी)ः दुष्काळाला कायमस्वरूपी लढा देण्यासाठी आणि जलसंधारणासाठी रविवार दिनांक २२ एप्रिल २०१८ रोजी विठ्ठलवाडी ता.माढा येथे झालेल्या महाश्रमदानामध्ये बबनरावजी शिंदे शुगरचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांच्या समवेत कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी आणि शेकडो ग्रामस्थांनी जवळपास ५०० घनमीटर डीप सीसीटी चर खोदल्या आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी बबनरावजी शिंदे शुगरचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांनी हाती घेतलेल्या दुष्काळमुक्ती श्रमदानाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे म्हणाले की, विठ्ठलवाडी हे सुशिक्षित व नोकरदारांचे गाव असूनही स्वतःच्या गावाला दुष्काळमुक्त व पाणीदार बनविण्यासाठी प्रत्यक्ष श्रमदान करण्यासाठी दररोज येणा-या लोकांचे प्रमाण कमी आहे याउलट भूमीहीन असलेले नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे युवक हे स्वतः दररोज सकाळी श्रमदान करीत आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. याप्रसंगी त्यांनी जेसीबी व पोकलेन मशीनसाठी डिझेल मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या सार्वत्रिक श्रमदानाच्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाबरोबरच मनसंधारण सुध्दा होण्यास मदत होते असे मत त्यांनी व्यक्त केले. यापुढे आजच्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन  जास्तीत जास्त लोकांनी मतभेद विसरून एकत्र येऊन श्रमदान करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
याप्रसंगी विशेष बाब म्हणजे माढा प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण , प्रेस क्लबचे अध्यक्ष चारूदत्त माढेकर, अय्युबखान शेख,आदर्श पञकार संदीप शिंदे ,अमर गायकवाड व दैनिक माणदेशनगरी पेपरचे माढा तालुका प्रतिनिधी तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनीही श्रमदान करून दररोज लेखणीसाठी चालणारा हात श्रमदानासाठी चालवून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि इतरांना प्रेरणादायी आहे. विठ्ठलवाडी येथील पाणी फौंडेशनच्या टीमने वृक्षारोपण, शोषखड्डे आणि १००० घनमीटर डीप सीसीटी चर व ओढा खोलीकरण व रुंदीकरणाची कामे करीत वॉटर कप स्पर्धेच्या कामात आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महाश्रमदानाच्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे, उपळाई खुर्दचे युवानेते संदीप पाटील, कारखान्याचे जनरल मॅनेजर कैलास मते, उप जनरल मॅनेजर अरविंद चौधरी, मुख्य शेतकी अधिकारी शहाजी हांडे, सिव्हील इंजिनिअर शंकर तहसीलदार, सरपंच बालाजी गव्हाणे, उपशाखाप्रमुख मोहन कदम,पतसंस्थेचे चेअरमन अनिलकुमार अनभुले,उपसरपंच अनिलकुमार बरकडे, भिमराव शिंगाडे, धनाजी सस्ते, पोलिस पाटील बालाजी शेगर, ग्रामसेवक हनुमंत कदम, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, विकास अधिकारी विजय गव्हाणे ,सहाय्यक विक्रीकर निरीक्षक बंडू खरात, निरंजन कदम, प्रा.अरूण कदम,अनंता जाधव, सौदागर गव्हाणे, किशोर गुंड, महादेव बरकडे, दिपक गव्हाणे, समाधान कोकाटे, सज्जन मुळे, भिवाजी जाधव,  कांतीलाल शेंडगे,सतीश गुंड,अमोल गव्हाणे, जयराम भिसे, सुभाष सस्ते, शंकर जाधव, मारूती शेंडगे, शिवाजी कोकाटे, बाळू खांडेकर, ज्ञानेश्वर शेंडगे, प्रशांत कदम, भास्कर कोकाटे, तानाजी मोटे, वैभव अनभुले, रामलिंग शेगर,अक्षय आहेर, निखिल शेंडगे, संदीप सस्ते, रणजित शेंडगे यांच्यासह ग्रामस्थ व सनराईज मिञमंडळाचे सदस्य आणि पाणी फौंडेशनच्या टीमचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सुञसंचालन करून आभार आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी मानले.  
Reactions

Post a Comment

0 Comments