अक्कलकोट येथे स्वामी समर्थ पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 3, 2018

अक्कलकोट येथे स्वामी समर्थ पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन

अक्कलकोट (प्रतिनिधी)ः येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा १४० व्या पुण्यतिथी महोत्सव १ ते १४ एप्रिल अखेर होत असून त्यानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व धर्मसंकीर्तन महोत्सवाचे संयोजक डॉ. हेरंबराज पाठक यांच्या हस्ते व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले.१ ते १३ एप्रिल अखेर होणार्‍या भजनसेवेची सुरुवात भजन सेवा संयोजक तात्यासाहेब घाटगे यांच्या अधिपत्याखाली व चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत दुर्गा महिला भजनी मंडळ सोलापूर यांच्या पुण्यतिथी महोत्सवातील धर्मसंकीर्तन कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून व प्रतिमेचे पूजन करून कोल्हापूर येथील ह.भ.प. इंद्रजीत देशमुख यांच्या प्रवचनाने झाली. या धर्मसंकीर्तन सोहळ्यात विविध नामांकित मान्यवरांचे प्रवचन, कीर्तन, भक्तिसंगीत, भारूड इत्यादी कार्यक्रम होणार आहेत तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा व स्वामी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंगळे यांनी केले.
याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, उज्ज्वलाताई सरदेशमुख, शरणप्पा लिंबीतोटे, शिवशरण अचलेर, श्रीनिवास इंगळे, अमर पाटील, अविनाश क्षीरसागर, संजय पाठक, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, प्रवीण घाटगे, सिद्धाराम कुंभार, नागनाथ गुंजले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, मनोज काळे, इत्यादी उपस्थित होते.
भजनसेवेने झाली. या भजन सेवेत अक्कलकोट, सोलापूर, वैराग, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, लातूर, माळीनगर, पानमंगरूळ इत्यादी ठिकाणांहून येणार्‍या ४८ भजनी मंडळांची भजनसेवा होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages