Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी हल्लाबोल आंदोलन ः निरीक्षक प्रदीप गारटकर

नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर हल्लाबोलच्या व्यासपीठाचे पूजन 

सोलापूर (प्रतिनिधी)ः भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राज्यभरात हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातही हल्लाबोल आंदोलन यशस्वी होईल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्याचे निरीक्षक प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला.
   सहा एप्रिल रोजी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता हल्लाबोल आंदोलनांतर्गत जाहीर सभा होणार आहे. यासाठी उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे पूजन मंगळवारी सकाळी निरीक्षक गारटकर आणि जेष्ठ नेते युन्नुभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी ते बोलत होते.
 राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे.  पुन्हा एकदा राज्यातील जनता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरकार आणण्यासाठी तयारीला लागली आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारचे वाभाडे काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारच्या पायखालची वाळू सरकू लागली असल्याचेही निरीक्षक गारटकर यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव,कार्याध्यक्ष संतोष पवार,मनोहर सपाटे, महेश गादेकर,राजन जाधव,पद्माकर काळे,जुबेर बागवान,राजू कुरेशी,नगरसेविका सुनीता रोटे,चंद्रकांत पवार,प्राचार्य. श्रीनिवास कोंडी,आनंद मुस्तारे,महेश निकंबे,जावेद खैरदी,प्रमोद भोसले,दिलावर मणियार,प्रशांत बाबर,,सुहास कांदम , निशांत सावळे,दीपक राजगे,छगन पंढरे, महंमद इंडीकर,राजू बेळेनवरु, युवराज माने,अरविंद दामजी , अमीर शेख,सायरा शेख,सिया मुलाणी,गौरा कोरे,निलोफर तांबोळी,संजय मोरे,अमित मोतेवार,राज बिटला,मुकुंद शिवशरण,सूर्यकांत बेंद्रे,महेश कुलकर्णी,हरिदास डिंगरे,रवी गायकवाड,तनवीर गुलजार,प्रकाश जाधव,  राजेश अच्युगटला, संजय सरवदे,शहानवाज सिंदगीकर,जावेद मुल्ला,सनी अलकुंटे,तमजीद चौधरी,संदीप विटकर आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments