Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य काळातील इतिहास युवकांना प्रेरणादायी- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

 स्वातंत्र्य काळातील इतिहास युवकांना प्रेरणादायी- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी


 

 

सोलापूर. (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक स्वातंत्र्यसेनानींनी कुटुंबाचा त्याग केला. कठोर कष्ट घेतलेस्वत:चे बलिदान दिले. त्यांचा स्वातंत्र्य काळातील इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेलअसे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. 
 
              हर घर तिरंगा, फाळणी वेदना स्मृती दिवस आणि भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालयसोलापूर व मध्‍य रेल्‍वे विभागसोलापूर यांच्या संयुक्‍त विदयमाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटनाऐतिहासिक स्थळेराष्ट्र ध्वजाचा इतिहासज्ञात  अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन रेल्वे स्टेशन येथे भरविण्यात आले आहे. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री कुलकर्णी बोलत होते.
 
          यावेळी वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी मच्छिंद्र गळवे,  जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्केक्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, रेल्वे वैद्यकीय अधिकारी मंजुनाथ, स्टेशन व्यवस्थापक व्ही के श्रीवास्तवउद्योजक विरेश नसलेभारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे,  माजी सैनिक दिवाकर रेळेकर, बाळासाहेब खराडे आणि कार्यालय सहायक जे एम हन्नुरे आदी उपस्थित होते.  
 
 
          कुलकर्णी म्हणाले कीभारतीय स्वातंत्र्य संग्रामावर लावण्यात आलेले दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहेकारण गुगल आणि सोशल मिडीया मध्ये देखील शोधून न मिळणारे असे अनेक दुर्मिळ छायाचित्र या प्रदर्शनामध्ये लावण्यात आले आहे. सदर चित्रे हे भारत सरकारकडे जतन करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यामध्ये बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींना या निमित्ताने अभिवादन करतोदेशातील अतिशय दुर्मिळ छायाचित्रांचे हे प्रदर्शन असून सर्व नागरिकांनी आवर्जून पहावे.
 
            अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार म्हणालेभारतीय स्वातंत्र्य दिनानिमित आयोजित केलेले हे प्रदर्शन युवा पिढीसाठी उपयुक्त आहे. स्वातंत्र्य काळातील त्यागबलिदानअत्याचार या इतिहासाची आठवण सर्वांना व्हावीया उद्देशाने प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाबरोबर फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्तच्या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावाअसे आवाहनही त्यांनी केले. 
 
             जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के म्हणाले कीभारतीय स्वातंत्र्य दिनानिमित प्रदर्शनात मांडण्यात आली माहिती अभ्यासपूर्ण आणि संग्रही ठेवण्यासारखी आहे. केंद्रीय संचार ब्युरोचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे. प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकइतिहास अभ्यासकसंशोधकस्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी व युवकानी  लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले. याप्रसंगी अरुणकुमार तळीखेडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
 
             जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आल्याची माहिती केंद्रिय संचार ब्‍युरोसोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कविता काजळे यांनी केले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला सही द्वारे शुभेच्छा संदेश दिला.
 
              रेल्वे स्टेशनवरील प्रदर्शन आजपासून १५  ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. सदर प्रदर्शनामध्ये १८५७ ते १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या चंपारण सत्याग्रहखेडा सत्याग्रहअसहयोग आणि खिलाफत चळवळबार्डोली सत्याग्रहचौराचौरीकाकोरी काण्डचितगाव शस्त्रागारहिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनसविनय कायदेभंगदांडी यात्राचलेजाव आंदोलन, विभाजनस्वातंत्र्यदिनसंस्थानचे विलीनीकरण आणि संविधान सभा अश्या विविध घटनाऐतिहासिक स्थळे, राष्ट्र ध्वजाचा इतिहास, सोलापुरातील चार हुतात्मेसेल्फी बूथभारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकूर सहित माहिती मांडण्यात आली आहे.
 

Reactions

Post a Comment

0 Comments