केंद्रीय संचार ब्युरोतर्फे “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो ,भारत स्काऊट गाईड आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी आठ वाजता जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका येथून खेळाडू आणि विद्यार्थ्यांची घरोघरी तिरंगा रॅली काढण्यात आली.
पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आले. जनतेत देशभक्ती व राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करणे हा या तिरंगा रॅली काढण्यामागचा उद्देश असल्याचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, मुख्य क्रीडा अधिकारी दत्ता वरखड, तालुका क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर, जिल्हा संघटक अनुसया शिरसाट, श्रीधर मोरे, कार्यालय सहाय्यक जे एम हनुरे, परमेश्वर चांदोडे, रिजवाना पठाण,आरती मलजी, यासीन शेख, अशपाक शेख आणि निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव आदी उपस्थित होते.
रॅली ची सुरुवात जिल्हा क्रीडा संकुल येथून करण्यात आली तिरंगा व देशभक्तीपर संदेश असलेले फलक घेऊन विद्यार्थ्यांनी एक शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी मिरवणूक नागरिकांना यावेळी पाहायला मिळाली.
रॅलीमुळे मार्गातील स्थानिक नागरिक देशभक्तीपर भावनेने भारावून गेले व अनेकांनी स्वयंपूर्ण यात सहभाग घेतला. शिवाय भारत माता की जय, वंदे मातरम, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हर घर तिरंगा आदी जयघोषाने संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगून गेले.
रॅलीमध्ये भारत स्काऊट गाईड, परिवर्तन पोलीस अकॅडमी, श्री मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे नगर आणि बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि खेळाडू सहभागी झाले होते.

0 Comments