हुतात्मा बागेत गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.ग्रामदैवत सिद्धेश्वर तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे तलावातील पाणी नैसर्गिक हाय फ्लड लेबलवरून हुतात्मा बागेच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनमध्ये मिसळत आहे. हुतात्मा बागेमध्ये मॉर्निंग वॉकसाठी येणार्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे बागोतील लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य पाण्यात गेले आहे.
शहरात गेली चार दिवस झाले पावसाची संततधार चालू आहे. या पावसामुुळे शहरातील सखल भागात पाणी साठले आहे. त्याशिवाय अनेक नगरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहे. अनेक ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. महपालिकेची आपत्कालीन यंत्रणा ठिकठिकाणी काम करत आहे. मात्र सोलापूरसह अनेक जिल्हामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र चार दिवसांत शहरात झालेल्या पावसामुळे सिद्धेश्वर तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तलावातील पाणी हुतात्मा बागेच्या माध्यमातून गटारीत जात आहे. पावसामुळे सिद्धेश्वर तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. वाढलेल्या पाण्यामुळे सिद्धेश्वर तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. दशक्रिया विधीजवळ तलावातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर नैसर्गिकरित्या हाय फल्ड लेवलवरून पाणी बाहेर जाण्याची सोय आहे. ते पाणी हुतात्मा बागेतून सुभाष चौकातील ड्रेनेजलाईनमध्ये जात आहे. ही नैसर्गिक कृती आहे. पाणी हुतात्मा बागेच्या माध्यमातून जात आहे. बागेतून वाहत जाणारे पाणी दुर्गंधीयुक्त, शेवाळयुक्त असल्याने मोठा वास बागेत मॉर्निंग वॉकसाठी येणार्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर पावसामुुळे बागेत सर्वत्र पाणी साठले आहे. लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य पाण्यात गेले आहे.
0 Comments