Hot Posts

6/recent/ticker-posts

शंभरहून अधिक भगिनींनी बांधली सुरज देशमुख यांना राखी

शंभरहून अधिक भगिनींनी बांधली सुरज देशमुख यांना राखी




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख यांना टेंभुर्णी येथील सिध्दार्थनगर भागातील शंभरहून अधिक भगिनींनी राखी बांधत यंदाची राखी पोर्णिमा साजरी केली. 
   या अनोख्या राखी पार्णिमेबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की,सामाजिक जीवनात कार्य करताना समाजकार्याची आणि विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवणे हा आमचा कायमचा संकल्प राहिला आहे. देशमुख कुटुंब खऱ्या अर्थाने या सेवाकार्यात अग्रभागी राहते, याची पावती आज सिद्धार्थ नगरमध्ये टेंभुर्णी येथे मिळाली.सगळेच नाते हे रक्ताचे नसतात. काही नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी आणि आपुलकीची असतात. आज १०० पेक्षा जास्त भगिनींनी माझ्या हातावर राखीचा धागा बांधला. हा धागा फक्त राखी नसून एक विश्वास, एक जबाबदारी आणि एक आयुष्यभर टिकणारा आपुलकीचा बंध आहे. भगिनींनी दाखवलेले हे अपार प्रेम माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, जे मला समाजसेवेच्या वाटचालीत नवी ऊर्जा देत राहील. हा सण माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय ठरला आहे.असेच प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास आमच्यावर कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
   या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन परमेश्वर दादा खरात, नितीन खरात, यशपाल दादा लोंढे, समीर नाईकनवरे, आशिष लोंढे, शारंग गायकवाड, रोहन लोंढे  व सिद्धार्थ नगर मित्र परिवार खूप सुंदर केले होते.यावेळी उपस्थित भगवान खरात, RPI शहराध्यक्ष रमेश लोंढे, माणिक खरात, कैलास लोंढे, मुकुंद लोंढे, संतोष साळवे, संतोष खरात, अनिल लोंढे, अनिल जगताप, दत्ता जगताप, दिपक लोंढे, अमर गायकवाड, विशाल जगताप, स्वप्नील लोंढे, रोहित गायकवाड, महेश धोत्रे, करण सरवदे, आयुष खरात, सिद्धार्थ लोंढे होते.
Reactions

Post a Comment

0 Comments