Hot Posts

6/recent/ticker-posts

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रवादीकडू अभिवादन...

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रवादीकडू अभिवादन...


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पार्क चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महापुरुषार्थ, संविधाननिर्मितीतील मोलाच्या योगदानाची आठवण करण्यात आली.
पार्क चौक परिसरात “जय भीम” घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांचे स्मरण करून ते समाजपरिवर्तनासाठी मार्गदर्शक राहतील असे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी सांगितले. 
या अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदनशिवे,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रा.श्रीनिवास कोंडी , जेष्ठ नेते दत्ता गायकवाड ,माजी नगरसेवक गणेश पुजारी,प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे, OBC सेल विभाग प्रदेश  उपाध्यक्ष बसवराज बगले, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भरत साबळे, VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेशकुमार भोसले, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,युवक संघटक दत्तात्रय बडगंची, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे,दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे,निशांत तारानाईक ,शहर सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड, शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश झाडबुके, सूर्यकांत शेरखाने, महिपती पवार, प्रवीण गाडे विधीज्ञ सेल शहराध्यक्ष ॲड. जयप्रकाश भंडारे,सद्दाम रंगरेज,अर्चना दुलंगे, उमादेवी झाडबुके, शोभा सोनवणे ,प्रियंका पवार, यांच्यासह पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Reactions

Post a Comment

0 Comments