निरपेक्ष भावनेने काम केल्याने समाधान मिळते- सुनिल दुधगावकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्षेत्र कोणतेही असु द्या,काम करत असताना आपण जर निरपेक्ष भावनेने काम केले तर समाधान मिळते.त्या समाधानाची तुलना करता येत नाही.असे मत भ.नि.नि.व वेतन पथकाचे सेवानिवृत्त अधिक्षक सुनिल दुधगावकर यांनी व्यक्त केले.
भ.नि.नि.व वेतन पथकाचे अधिक्षक सुनिल दुधगावकर ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. यावेळी डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,महाराष्टृ राज्य शिक्षक सेना,शिवछत्रपती शिक्षक संघटना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.सेवानिवृत्त म्हणजे नवीन अध्यायाची सुरुवात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतुल नारकर यांनी तर बरगली लांडगे यांनी आभार मानले.यावेळी संघटनेचे सुनिल चव्हाण,आप्पाराव इटेकर,आप्पासाहेब पाटील,संतोष माशाळे,सचिन चौधरी,माजिद कलादगी,श्रीराम जाधव, मुरलीधर कडलासकर,दत्तात्रय पांढरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.png)
0 Comments