सोलापुरात दीड-दीड टक्का रिकव्हरी मारणारे महाभाग आहेत- राजू शेट्टी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप एफआरपीबाबत तोंड उघडलेले नाही. कारखानदार दराबाबत साखळी करून गप्प आहेत. पण, आम्ही आता गप्प बसणार नाही. दोन दिवस आम्ही वाट पाहू आणि कारखान्यांच्या गव्हाणी बंद पाडणार आहोत. एक टक्के रिकव्हरी कमी दाखवतात, एक टक्के रिकव्हरी मारल्यावर 10 किलो साखर कमी होते, त्यातून टनामागे 440 रुपये कमी होता. सोलापुरात दीड दीड टक्के रिकव्हरी मारणारे महाभाग आहेत, असा गौप्यस्फोट माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी सोलापूरच्या साखर कारखानदारांनी एफआरपीबाबत घेतलेल्या धोरणाबाबत भाष्य केले आहे. ऊसदराबाबत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत राजू शेट्टींनी टीका केली आहे.
यावर्षी ऊस कमी असल्याने गाळप कमी होणार आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप एफआरपीबाबत तोंड उघडलेले नाही. कारखानदार ऊसदराबाबत साखळी करून गप्प आहेत. पण, आम्ही आता गप्प बसणार नाही. दोन दिवस आम्ही वाट पाहू, त्यानंतर आम्ही कारखान्याच्या गव्हाणी बंद पाडणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.
शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्ताच आपला ऊस कारखान्यांना ऊस घालू नये. सोलापूर जिल्ह्यात रिकव्हरी कमी दाखवली जाते. एक टक्के रिकव्हरी कमी दाखवतात, त्यामुळे एक टक्का रिकव्हरी मारल्यावर 10 किलो साखर कमी होते, त्यातून ४४० रुपये टनामागे मिळतात. सोलापूर जिल्ह्यात दीड टक्के रिकव्हरी कमी दाखवणारे कारखानदार आहेत, त्यासाठी आम्ही आता भरारी पथक करणार आहोत.
साखर आयुक्तांना ऊस दराबाबत आम्ही कळवले आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आयुक्त कारवाई करत नाहीत. नियमानुसार शेतकऱ्याने साखर करखान्याला ऊस दिल्यावर 15 दिवसांत बील देण्याचा नियम आहे. मात्र, अद्याप मागील दोन वर्षांपासून बील दिले नाही. ते बील व्याजासहित द्यायला पाहिजे. मात्र, कारखानदार बील देत नाहीत
झालेल्या निवडणुकांचा इतरत्र परिणाम होत नाही : राजू शेट्टी
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख ही २१ डिसेंबर जाहीर केली आहे. पण कोर्टाने घेतलेला हा निर्णय अनाकलनीय आहे. राज्यातील सुमारे 20 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे गेल्या; म्हणून इतर ठिकाणची मतमोजणी थांबवणे कितपत योग्य आहे. मुळात ज्या निवडणुका झाल्या, त्याचा परिणाम इतरांवर होत नाही, असा दावाही राजू शेट्टींनी केला आहे.

0 Comments