अनगर विद्यालयाचा राज्यस्तरीय दुहेरी विजयानं अभिमान द्विगुणित!
अनगर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अनगर येथील विद्यार्थिनी व शिक्षिकेने मिळवलेले दुहेरी यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
या स्पर्धेत कुमारी सानिका संजय गुंड (विद्यार्थी गट) हिने प्रथम क्रमांक, तर शिक्षक पदवीधर गटातून ज्योती सत्यवान भडकवाड यांनीही प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचा गौरव वाढविला. यांना सत्यवान दाढे व अर्चना गुंड यांनी मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक व राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील, लोकनेतेचे चेअरमन विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील व मुख्याध्यापक संजय डोंगरे यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
विद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात प्राचार्य चंद्रकांत ढोले यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सानिका गुंड व ज्योती भडकवाड यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

0 Comments