शिवसेनेतर्फे प्रभाग १६ मध्ये विकासकामांचे भूमिपूजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ३.५ कोटी रुपयांच्या विशेष निधीपैकी २५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी प्रभाग क्र. १६ मध्ये करण्यात आले. नागरिकांसाठी सुविधावृद्धीचा हा महत्त्वाचा टप्पा असून भूमिपूजन सोहळ्यास शिवसेनेचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
गांधीनगर विणकर सोसायटीच्या समोरील मैदान परिसरात सुरू होणाऱ्या या विकासकामांचे भूमिपूजन शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहरप्रमुख सचिन चव्हाण, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख व संयोजक प्रियदर्शन साठे, संयोजक भीमा वाघमारे यांच्या हस्ते पार पडले.निधीच्या माध्यमातून परिसरात सार्वजनिक सुविधा, परिसर सुशोभीकरण आणि मूलभूत गरजांची पूर्तता करणारी कामे हाती घेतली जाणार आहेत. या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन मारुती माळगे, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, शहरप्रमुख सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियदर्शन साठे यांनी तर सूत्रसंचालन अमोल सिताफळे यांनी केले.आभार प्रदर्शन भीमा वाघमारे यांनी मानले.यावेळी पंचाक्षर स्वामी, अभिजीत बळप, दीपक पाटील, शैलेश मारा, अल्फान आबादीराजे, शिवाजी साठे, निलेश आळगुंडगी, दत्तात्रय द्यावरकोंडा, खाटीक समाजाचे अध्यक्ष कांबळे, शितल परदेशी, धनंजय पाटील, किशोर चलवादी, अमित माकणी, पडळकर आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.या भूमिपूजनामुळे परिसरातील विकासकामांना गती मिळून प्रभाग १६ मध्ये सुविधा वाढण्यास मदत होणार आहे.
.png)
0 Comments