तब्बल ९६.९८ टक्के मतदान; सोपल-राऊत पॅनेलमध्ये कडवी लढत!
बार्शी (कटूसत्य वृत्त):- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोळा जागांसाठी रविवार (ता.७) रोजी उत्स्फुर्त मतदान झाले शहरातील सुलाखे हायस्कूल, नवीन मराठी शाळा येथे सात मतदान केंद्रावर तर वैराग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तीन मतदान केंद्रावर चुरशीने मतदान झाले सकाळपासून मतदान केंद्राबाहेर विद्यमान आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे गट तळ ठोकून होते मतदान प्रक्रिया संल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करुन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
निवडणुकीत आमदार दिलीप सोपल यांचे बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी पॅनल तर माजी आमदार राजेंद्र यांच्या बळीराजा विकास आघाडी पॅनल यांच्यामध्ये सरळ लढत झाली निवडणूकीत यापूर्वीच माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या अडते व व्यापारी मतदारसंघातून दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत उर्वरित सोळा जागांसाठी मतदान झाले. सकाळी सात ते सायंकाळी यावेळेत मतदान असल्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांना चार-चाकी वाहनातून आणण्यात येत होते सकाळी दहानंतर मतदानाला वेग येऊन दुपारी अडीचपर्यंत साठ टक्के पेक्षा अधिक मतदान झाले होते महिलांचा सहभाग उत्फुर्त जाणवला.
सहकारी संस्था मतदारसंघाच्या आकरा जागांसाठी १ हजार ६४५ मतदारांपैकी १ हजार ६३३ मतदारांनी हक्क बजावला तसेच ग्रामपंचायत मतदार संघाच्या चार जागांसाठी १ हजार ३९ मतदारांपैकी १ हजार २४ मतदारांनी हक्क बजावला हमाल तोलार मतदारसंघाच्या एका जागेसाठी १ हजार २५ मतदारांपैकी ९३७ मतदारांनी हक्क बजावला.
सहकारी संस्था मतदारसंघात ९९.२७ टक्के, ग्रामपंचायत मतदार संघात ९८.८५ टक्के, हमाल तोलार मतदारसंघात ९१.४१ टक्के मतदान झाले ३ हजार ७०९ मतदारांपैकी तीन हजार ५९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मतदानप्रसंगी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मतमोजणी सोमवार (ता.८) रोजी उपळाई रस्त्यावरील आदित्य कृष्ण मंगल कार्यालयात सकाळी सात वाजता सुरु होणार असून विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता लागली आहे.

0 Comments