तोफिक पैलवान प्रभाग क्रमांक 20 व 21 संदर्भात
हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात दाद मागणार..!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सध्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक हे लवकरच लागण्याची शक्यता आहे" त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात आले होते" 2017 साली जी प्रभाग रचना जाहीर करण्यात आले होते तीच प्रभाग रचना असण्याची दाट शक्यता वर्तवली जात होते" परंतु काल सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अंतिम प्रभाग रचना ही जाहीर करण्यात आले त्यामध्ये सोलापूर शहरातील काही प्रभागात फेरबदल करण्यात आले विशेषता हादवाड भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नई जिंदगी परिसरातील प्रभाग क्रमांक 20 आणि 21 यात मोठे फेरबदल झाल्याने आजी-माजी व भावी नगरसेवक हे देखील अचंबित झाले" दरम्यान माजी नगरसेवक तोफिक शेख पैलवान यावेळी बोलताना म्हणाले की सदरची प्रभाग रचना 20 आणि 21 हे जाणून-बुजून करण्यात आले आहे" यात विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 20 वीस मध्ये दोन नगरसेवक मुस्लिम तर दोन नगरसेवक इतर धर्माचे निवडून येतात" व प्रभाग 21 मध्ये चारही नगरसेवक हे मुस्लिम समाजाचे निवडून येतात" अशी परिस्थिती असताना प्रभाग 20 व 21 यामध्ये फेरबदल करण्यात आल्याने यंदा मात्र प्रभाग क्रमांक २० मध्ये चारच मुस्लिम समाजाचे नगरसेवक निवडून येणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगात आहे परंतु यामध्ये मुस्लिम समाजावर अन्याय होतोय सदरील प्रभाग रचनेवर आमचे हरकत असून आम्ही यासंदर्भात हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती यावेळी माजी नगरसेवक तौफिक पैलवान यांनी दिली
0 Comments