श्री सिद्धेश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे च्या मुलींच्या खो खो स्पर्धेत विजयी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या 17 वर्षे वयोगट शहर स्तरीय खो-खो स्पर्धेत श्री सिद्धेश्वर प्रशालेच्या मुलींचा संघ सलग दुसऱ्या वर्षी विजयी ठरला आहे.या संघाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे
सदर संघाचे कर्णधारपद तस्मिया पटेल हिच्याकडे होते. सुप्रिया चाबुकस्वार, मयुरी सोनकडे, श्रद्धा चाबुकस्वार, धनश्री हिरेमठ,सना शेख, श्रेया होनराव, प्राची सुकंद,जबीन मुल्ला, राधिका शिवशरण, मोहिनी सोनकडे,आनंदी ढोणे, कोमल जडगे, श्रावणी पटणे, श्रुती रामशेट्टी या मुलींच्या संघाने ही कामगिरी केली.
या घवघवीत यशाबद्दल यशस्वी खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सिताराम भांड व सहाय्यक क्रीडा शिक्षक गौरीशंकर कोनापुरे यांचे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनअण्णाराज काडादी, शालेय शिक्षण समितीचे सदस्य सिद्धाराम चाकोते , गुरुराज माळगे, शिवशंकर बिराजदार, समीर सलगर श्री सिद्धेश्वर शिक्षण संकुलाचे समन्वयक संतोष पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक काशिनाथ आकाशे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महासिद्ध मेसे व प्रशालेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
0 Comments