Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगराध्यक्षपदासाठी शितल सुशील क्षीरसागर यांच्या नावाला सर्वाधिक पसंती

 मोहोळ नगराध्यक्षपदासाठी शितल सुशील क्षीरसागर यांच्या नावाला सर्वाधिक पसंती




क्षीरसागर यांच्या युवा आणि सुशिक्षित उमेदवारीला पक्षस्तरावरूनही अनुकूलता



मोहोळ (साहील शेख):- मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईमध्ये निघाल्यानंतर खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना आपल्या निवडणूक लढवण्याच्या इच्छेला नाईलाजाने मुरड घालावी लागली. मात्र तरीही चांगल्या प्रतिमेच्या आणि प्रभावी जनसंपर्काच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी संधी देऊन नगराध्यक्ष पदाचे किंगमेकर होण्यासाठी अनेक सर्वपक्षीय दिग्गजांनी आपापले राजकीय कौशल्य पणाला लावले आहे. सध्या मोहोळ शहरात शितल सुशील क्षीरसागर या सुशिक्षित आणि युवा महिला नेतृत्वाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची सर्वाधिक चर्चा आहे.

मोहोळ नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे मोहोळ शहरातील ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या स्नुषा आणि भाजपाचे यापूर्वीचे नगरसेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष सुशील क्षीरसागर यांच्या सुविद्य पत्नी शितल सुशील क्षीरसागर यांच्या उमेदवारीला महायुतीच्या दृष्टिकोनातून मोठी राजकीय अनुकूलता जाणवत आहे. भारतीय जनता पक्षाकडून युती झाली तर महायुतीकडून निवडणूक लढविण्यासाठी शितल क्षीरसागर ह्या इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीसाठी भाजपाच्या वरिष्ठ स्तरावरून आवश्यक ती राजकीय पूर्व चाचपणी सुरू असल्याचे समजते.

आरक्षण सोडतीनंतर तात्काळ भाजपमधील वरिष्ठ पक्षश्रेष्ठीं तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांची सुशील क्षीरसागर यांनी भेट घेऊन उमेदवारी बाबत गांभीर्याने चर्चा केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काय राजकीय घडामोडी घडतात आणि शितल क्षीरसागर यांच्या उमेदवारीला पक्षस्तरावरून कधी हिरवा कंदील मिळतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

चौकट
सुशील क्षीरसागर हे मोहोळ शहरातील अजातशत्रू युवा नेते म्हणून ओळखले जातात. प्रभाग सोळाच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आजवरच्या राजकारणामध्ये कधीही कोणत्याही सर्वपक्षीय नेत्यांना चिमटे काढण्याचे आकसाचे राजकारण केले नाही. त्यामुळे त्यांच्या सुविद्य पत्नी शीतल क्षीरसागर यांची उमेदवारी ही शहराच्या दृष्टीने सर्व समावेशक उमेदवारी ठरू शकते. शितल क्षीरसागर या उच्चशिक्षित असून यापूर्वी मोहोळ शहरातील विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी हिरिरिने भाग घेतला आहे.

चौकट
यापूर्वी पासून प्रभागाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करताना तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभागासाठी वेळोवेळी विशेष निधी आणला. त्यामधून चांगल्या दर्जाचे सिमेंट रस्ते आणि अद्यावत विकास कामे केली आहेत. त्यामुळे शहरातील सर्वाधिक लोकप्रिय नगरसेवक म्हणून सुशील क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. सध्या मोहोळ शहरातील सर्वात अद्यावत आणि विकसित प्रभाग म्हणून प्रभाग सोळाकडे पाहिले जाते. आता हा प्रभाग नव्याने झालेल्या नऊ प्रभागामध्ये समाविष्ट झाला आहे. यापूर्वी नगर परिषदेच्या कामाचा पूर्वानुभव असलेल्या क्षीरसागर परिवारातील प्रतिनिधी म्हणून शितल क्षीरसागर यांची उमेदवारी सध्या सर्वात वरचढ मानली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments