सामाजिक क्षेत्राची जाण असण्याबरोबर मोहोळच्या व्यापारी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील युवा चेहरा
मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण नाना डोकेंनी निवडणूक लढवण्याची मागणी
मोहोळ (साहिल शेख):- मोहोळ शहराच्या राजकीय क्षेत्रात या नगरपरिषद निवडणुकीपासून काही नव्या चेहऱ्यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देणाऱ्या काही उद्योजकांनी देखील या नगरपरिषद निवडणुकीमध्ये निवडणूक लढवून प्रभागातील सेवा करण्याची गरज आहे. शहरातील काही जाणकार आणि सुजाण घटकांनी या उद्योजकांना नगरपरिषद निवडणुकीत उतरून प्रभागातील विविध मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याची विनंती केली आहे. त्यामध्ये सर्वात चर्चेत असलेले आणि सामाजिक सेवाकार्यात अग्रेसर ठरलेल्या मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष प्रवीण नाना डोके यांनी निवडणूक लढवण्याची मागणी आता जोर धरत आहे.
निवडणुकीची आरक्षण सोडत झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत आलेले मोहोळ शहरातील युवा उद्योजक प्रवीण नाना डोके हे होत. प्रवीण नाना डोके यांनी गेल्या दहा वर्षापासून मोहोळ शहराच्या सामाजिक आणि विविध सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची योगदान दिले आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याबरोबर मोहोळ शहरातील विविध संकटांना सामोरे गेलेल्या विविध क्षेत्रातील दुकानदारांना आर्थिक मदतीचा हात देखील देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यामुळे व्यापारी क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठीचा मोठा अनुभव पाठीशी असणाऱ्या नाना डोके यांनी प्रतीथयश पक्षाकडून उमेदवारी घ्यावी तसेच त्यांनी एक अनुभवी आणि मनमिळावू व्यापारी प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवावी. यासाठी त्यांच्या कार्याची जाण आणि त्यांच्या उमेदवारीच्या आवश्यकतेचे भान असणारा शहरातील एक मोठा वर्ग विविध सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार असल्याचे समजते.यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर विविध पक्षांचे प्रतिनिधी देखील प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे.
चौकट
प्रवीणनाना डोके वास्तव्यास असलेला डोके वस्ती हा मोठा परिसर प्रभाग नऊच्या कक्षेत येतो. या परिसरात बंधुभावाचा जनसंपर्क असलेल्या प्रवीण नाना डोके यांचा मोहोळ शहरात देखील मोठा मित्रवर्ग आणि हजारो ग्राहक वर्ग आहे. चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेपासून अध्यक्ष असलेले नाना डोके हे एक अजातशत्रू आणि निगर्वी व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. विविध सार्वजनिक उपक्रमामध्ये सहभागी होण्याबरोबर आवश्यक त्या ठिकाणी सेवाभावी कामाला विविध स्वरूपाची मदत सढळ हाताने देण्यामध्ये देखील ते अग्रेसर असतात. मोहोळ शहराच्या सार्वजनिक क्षेत्रात त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात सर्वाधिक अग्रेसर असलेला युवा चेहरा म्हणून ओळख मिळवलेल्या नाना डोके यांनी निवडणूक लढवण्याची अपेक्षा सर्वांना आहे.
0 Comments