माढा बातमी महा आरोग्य शिबीर 700 तपासणी
माढा (कटूसत्य वृत्त):-
धावपळीच्या युगात पैसै कमविण्यात जो तो दंग आहे.मात्र स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.सदृढ आरोग्याच्या दृष्टीकोनातून ठरावीक काळाने आरोग्य तपासण्या कराव्यात असे मत राजवी अॅग्रोचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.
उपळाई (खुर्द) ता.माढा येथे
कुषी भूषण कै. गणेश कुलकर्णी यांच्या १४व्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य मोफत तपासणी शिबिराच्या उद्घघाटन प्रसंगी प्रा.सावंत बोलत होते.शिबीरात ७३१ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
कै.गणेश कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत दिप प्रज्वलन करुन उद्घघाटन पार पडले. राजवी अॅग्रोचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत,माजी सनदी अधिकारी प्रकाश कुलकर्णी,ज्योती कुलकर्णी,नगराध्यक्षा मीनल साठे,कल्पना जगदाळे,संजय पाटील घाटणेकर नितीन कापसे,भारत शिंदे,विलास देशमुख,
मुन्ना साठे,शंभू साठे,अॅड. यशोदा ढवळे,अॅड. रत्नप्रभा जगदाळे,निलेश पाटील,आबा साठे,अनिस तांबोळी आदी उपस्थित होते.लहान बालकांपासून ते वयोवृध्दा पर्यत
सर्वच दुर्धर आजारावरील आरोग्याची तपासण्या या शिबिरात पार पडल्या.
डाॅ.सुभाष पाटील, डॉ. अल्पेश दोषी,
डाॅ.दर्शन बंग,डॉ. विकास मस्के,
डॉ. विजयकुमार लोंढे या डाॅक्टरांनी रुग्णांच्या तपासण्या करुन आरोग्य सल्ले देण्यात आले.
ज्योती कुलकर्णी,प्रकाश कुलकर्णी यांनी मनोगतातून गणेश कुलकर्णी यांच्या कार्याची माहिती देऊन कै. गणेश कुलकर्णी प्रतिष्ठानच्या कामाचा आढावा मांडला.शिबीर यशस्वीते साठी
गणेश कुलकर्णी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments