Hot Posts

6/recent/ticker-posts

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धांचे आयोजन

 शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धांचे आयोजन 




सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला शहर व तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे भव्य किल्ले बांधणी स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक निलकंठ शिंदे सर यांनी दिली.
 हि स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटातील स्पर्धकही आपला सहभाग नोंदवू शकतात अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.सांगोला शहर व तालुक्यातील लहान थोरांना दीपावलीच्या आगमनाला किल्ले बनवण्याचा मोठा छंद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण विश्व तलावर ज्ञात असून येणाऱ्या पुढच्या पिढीला गडकिल्ल्यांच्या माध्यमातून हे कार्य पुढे येणार आहे याकरता शहीद अशोक कामटे संघटना सातत्याने अशा वेगवेगळ्या विधायक उपक्रमांना गेल्या 16 वर्षापासून सातत्याने पाठबळ देण्याचे काम करते त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीत किल्ले बांधणी, किल्ले सजावट स्पर्धा 2025 करिता सहभागी स्पर्धकांनी नाव नोंदणी दि.16 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत शिंदे मशिनरी स्टोअर्स ,स्टेशन रोड सांगोला या ठिकाणी करावी. अधिक माहितीसाठी प्रा प्रसाद खडतरे, मकरंद पाटील 9850048514,9420726303 यांच्याशी संपर्क साधून या भ्रमणध्वनीवर नोंदणी करून आपले किल्ल्यांचे फोटो व व्हिडिओ व्हाट्सअप वर सर्व माहिती सहित पाठवावेत असे आव्हान शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments