Hot Posts

6/recent/ticker-posts

बंद पाणी पुरवठा योजना सुरु करा जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या बैठकीत सूचना

सोलापूर (प्रतिनिधी)ः यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात एकही टँकर द्यावा लागू नये अशारीतीने नियोजन करा. बंद नळ पाणी पुरवठा योजना सुरु करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज पाणी टंचाई आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी श्रीमती माळी यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक आणि खासगी स्त्रोतांची संख्या, बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करणे, विविध यंत्रणांकडील पाणी पुरवठा योजना, त्यासाठीच्या वीज देयकाची तरतूद याबाबतचा आढावा घेतला. टंचाई आराखड्याचे नियोजन करताना पंचसूत्रीचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना केल्या.
डॉ. भोसले यांनी  तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि उपअभियंता यांनी संयुक्तपणे गावांची तपासणी करुन टंचाई आराखडा बनवावा. कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊन टँकरची मागणी केली जाऊ नये. टँकरची खरोखर गरज आहे का? इतर सर्व उपाय उपयोगी पडत नाहीत हे स्पष्ट झाल्यावरच पाणीसाठी टँकरची मागणी करावी. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीकडील बंद असलेल्या पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी काय करावे लागेल याचा आढावा घ्या. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या नादुरुस्त असलेल्या पाणी पुरवठा योना दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असणारी निधीची मागणी करा. पाणी पुरवठा योजना सुरु करुन घ्या. जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्या जाव्या, अशा  सूचनाही डॉ. भोसले यांनी दिल्या.सार्वजनिक स्त्रोतांच्या परिसरात अनाधिकृतरित्या बोअर मारणार्‍या व्यक्ती आणि यंत्रसामग्रीवर कारवाई केली जावी. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपजिल्हाधिकारी शमा ढोक, मारुती बोरकर, शिवाजी जगताप, प्रमोद गायकवाड, भूजल सर्व्हेक्षणाच्या मेधा शिंदे, तहसिलदार ऋषिकेश शेळके, संजय पवार, मधुसुदन बर्गे, बाई माने, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड आदी उपस्थित होते
Reactions

Post a Comment

0 Comments