Hot Posts

6/recent/ticker-posts

टॉंवर बांधित शेतकर्‍यांच्या आंदोलनात जनसेवा उतरणार ः डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील

अकलूज  (विलास गायकवाड)ः टॉंवर बांधित शेतकर्‍यांना त्यांच्या जमीनिचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकर्‍यांच्या लढ्यात महाराष्ट्र जनसेवा संघटना उतरली असून शेतकर्‍यांना न्याय मिळवुन देण्यासाठी  कराव्या लागणार्‍या सर्व प्रकारच्या लढ्यात जनसेवा संघटना अग्रभागी राहणार असल्याचे डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
   महाराष्ट्र टॉवर बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकर्‍यांच्या या प्रश्नांसंबंधी येथील श्रीराम मंदिरात पत्रकार परिषद घेतली होती.अध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांनी सांगितले की,नुसत्या सोलापूर जिल्ह्यात टॉवर व तारा खालील बाधित जमीनधारक शेतकर्‍यांची संख्या सुमारे अडीच लाखांच्या घरात आहे.या तारा व टॉवरमूळे शेतजमिनीचे तर नुकसान होतेच परंतु जनावरांच्या आरोग्यासाठी ते फार घातक आहे. परंतु सरकार या जमिनीच्या नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मात्र कसलेही संवेदनशील नाही,त्यासाठी शेतकर्‍यांच्या बाधित जमिनीचा पंचनामा करीत नाही की अधिकृत संपादन करीत नाही. नुकसान भरपाई मध्ये तर बळी तो कांन पिळी ठरतोय.त्यामुळे बलदंड शेतकर्‍याला ५० लाख मिळत असले तरी गरीब शेतकर्‍याला मात्र अगदी ५० हजारही मिळत नाहीत.  एन.टी. पी.सी.ची प्रोजेक्त रिपोर्ट व इतर माहिती गोपनीयतेचे कारण दाखवून दिले जात नाही.म्हणजेच शेतकर्‍यांना पैसे मिळू नयेत हेच केंद्र व राज्य शासनाचे धोरण दिसत आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू असून आता तर जनसेवा संघटना यात उतरली आहे.त्यामुळे या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे.
आज अकलूज येथील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात या बाधित शेतकर्‍यांच्या तक्रारींची सुनावणी ठेवली होती, व त्यासाठी उपस्थित शेतकर्‍यानी सर्वांचे वतीने या संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ गायकवाड हे त्यांची भूमिका मांडतील,व तशी त्यांना परवानगी द्यावी अशी विनंती केली मात्र त्यानी ती नाकारल्याचे सांगितले.  यावेळी सरकार वेगवेगळ्या पळवाटा काढून शेतकर्‍यांना त्यांच्या नुकसान भरपाई मिळण्याच्या हक्कापासून वंचीत ठेवत आहे म्हणूनच महाराष्ट्र जनसेवा संघटनेने या शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी या आंदोलनाचे अग्रभागी राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.यावेळी माणिकराव मिसाळ,अण्णासाहेब इनामदार,शिवाजीराव इंगवलेदेशमुख,अण्णासाहेब शिंदे,नानासाहेब काळे,सतीश पालकर,दत्ता जाधव,सुधीर रास्ते आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments