माढा (प्रतिनिधी)ः देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार व पक्षाचेअभ्यासू नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आ.बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युती शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ठीक १० वाजता टेंभूर्णी ता. माढा येथे होणा-या हल्लाबोल आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद युती सरकारला दाखवून द्यावी असे आवाहन बबनरावजी शिंदे शुगरचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांनी केले आहे.
ते सोमवार दिनांक २ एप्रिल २०१८ रोजी मानेगाव जिल्हा परिषद गटातील अनुक्रमे दारफळ ,सुलतानपुर , उंदरगाव , केवड ,जामगाव ,अंजनगाव (उमाटे) , वडाचीवाडी (अ.उ.) ,कापसेवाडी ,धानोरे , बुद्रुकवाडी , खैराव व मानेगाव येथील गावभेटीच्या प्रसंगी ग्रामस्थ व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
हे हल्लाबोल आंदोलन यशस्वी करण्यासाठी सध्या जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे हे स्वतः माढा तालुका व विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन पूर्व तयारी बैठका घेऊन कार्यकर्ते व ग्रामस्थांना मार्गदर्शन आणि उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहेत. जनतेची उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे .
याप्रसंगी बोलताना मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष सुहास काका पाटील म्हणाले की, सध्याचे महाराष्ट्रातील शासन हे शेतकरी व कर्मचारी यांच्या विरोधी आहे.
मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे युतीचे सरकार शेतक-यांवर व गोरगरीब कष्टकरी जनतेवर कसे अन्याय करीत आहे हे दाखवून देण्यासाठी या आंदोलनात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
याप्रसंगी बोलताना उपसभापती बाळासाहेब शिंदे व माजी उपसभापती बंडूनाना ढवळे म्हणाले की, युती शासनाने जनतेचा अपेक्षाभंग व विश्वासघात केलेला आहे म्हणून या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला धडा शिकवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
याप्रसंगी बबनरावजी शिंदे शुगरचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे, मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष सुहासकाका पाटील, उपसभापती बाळासाहेब शिंदे ,माजी उपसभापती बंडुनाना ढवळे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक निलकंठ पाटील, माजी उपसभापती उल्हास राऊत , वडाचीवाडीचे सरपंच विठ्ठल भोईटे, चेअरमन भालचंद्र कदम, माढेश्वरी संचालक गणेश काशिद, सरपंच रमेश पाडूळे, विलास कौलगे, जालिंदर कापसे, नितीन कापसे, वैजिनाथ व्हळगळ, संदीप पाटील, अनिल काका देशमुख, तानाजी देशमुख, पंडित पाटील, पिंटू नागटिळक यांच्यासह विविध संस्थाचे चेअरमन व इतर पदाधिकारी आणि सरपंच व उपसरपंच आणि युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments