सोलापूर (प्रतिनिधी)ः अवयवदान आणि अवयवरोपण प्रक्रियेबाबत जनजागृती वाढलेली असली तरी डॉक्टरांमध्ये अधिक सजगता येण्यासाठी याचा एमबीबीएस अभ्यासक्रमात समावेश होणे आवश्यक असल्याचे मत शनिवारी यशोधरा रुग्णालयातील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
चर्चासत्रामध्ये झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डीनेटर कमिटीचे (झेडटीसीसी) सदस्य आरती गोखले, सुरेखा जोशी, डॉ. उर्वी शुक्ला, डॉ. अतुल मुळे यांचा सहभाग होता. यशोधरा रुग्णालयाचे डॉ. बसवराज कोलूर, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. किरण जोशी, डॉ. विजय शिवपुजे, डॉ. आनंद मालू, डॉ. निलरोहित पैके व डॉ. विठ्ठल कृष्णा आदी यावेळी उपस्थित होते.
चर्चासत्रामध्ये अवयवदानाबाबत आठवीनंतरच्या अभ्यासक्रमात माहिती समाविष्ट करण्याविषयी झेडटीसीसी प्रयत्न करणार काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. अतुल मुळे म्हणाले की, अवयवदान व अवयव रोपणाबाबत अद्याप एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे सर्वप्रथम याबाबत डॉक्टरांना सजग करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ब्रेनडेड झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना समुपदेशन करत असताना डॉक्टरांचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवयवदान करणार्या रुग्णांच्या नातेवाईकांना कोणताही मोबदला मिळत नाही. कारण अवयदान केल्याबाबत कोणतीही रक्कम स्वीकारता येणार नाही, अशी तरतूद कायद्यामध्ये आहे. अवयव रोपणासाठी मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी त्याचप्रमाणे शिर्डीतील साईबाबा ट्रस्ट व मुंबईच्या सिध्दीविनायक गणपती ट्रस्टतर्फे मदत करण्यात येत असल्याचे समाजसेविका आरती गोखले यांनी स्पष्ट केले.
फुफ्फुस रोपण शस्त्रक्रिया मध्यंतरी मुंबईत झाली होती; परंतु काही अडचणी उद्भवल्यामुळे तूर्त महाराष्ट्रात फुफ्फुस रोपण थांबवण्यात आले आहे. मात्र, आगामी सहा-सात महिन्यांत पुन्हा सर्व अडचणी दूर करून ही शस्त्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती डॉ. उर्वी शुक्ला यांनी दिली. नवजात अर्भकाचा मेंदू विकसित झालेला नसतो. त्यामुळे दोन वर्षांखालील मुले जरी आजारी असली तरी त्यांचा मेंदू मृत झाला आहे अथवा नाही, याचा निर्णय घेणे अवघड असल्याने सध्या दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे अवयव दानासाठी स्वीकारले जात नाहीत.
सोलापुरात यशोधरा हॉस्पिटलने अवयवदानाबाबत गेल्या काही दिवसात मोठे काम केले असून जिल्ह्यामध्ये याबाबत जागरूकता वाढली असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले. अवयवरोपण खासगी रुग्णालयांबरोबरच शासकीय रुग्णालयात होणे आवश्यक असून सध्या अशा रुग्णालयांची संख्या खूपच कमी आहे. शासकीय रुग्णालयात ही सुविधा सुरू झाली तर रोपणावरील खर्च कमी होऊ शकतो, असे मत चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

No comments:
Post a Comment