‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सभापती रविंद्र साठे यांच्या विशेष मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे १३ ऑक्टोबरला प्रसारण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सभापती रविंद्र साठे यांच्या विशेष मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे १३ ऑक्टोबरला प्रसारण

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सभापती रविंद्र साठे यांच्या विशेष मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे १३ ऑक्टोबरला प्रसारण




मुंबई (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील कारागीर, महिला, युवक आणि नवउद्योजकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पारंपरिक कौशल्य, स्थानिक साधनसंपत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात साठे यांच्या विशेष मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर होणार आहे. निवेदिका अवंती देसाई यांनी ही मुलाखत घेतली आहे. हा कार्यक्रम महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीत खादी व ग्रामोद्योग क्षेत्रातील रोजगारनिर्मिती, ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन, महिला व युवकांसाठी उपलब्ध संधी, स्थानिक उत्पादनांचे विपणन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयांवर साठे यांनी सविस्तर माहिती दिली.

ग्रामीण भागातील स्थानिक साधनसंपत्ती, पारंपरिक कौशल्य आणि मनुष्यबळाचा योग्य उपयोग करून स्थानिक पातळीवर उद्योग उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ग्रामोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना आवश्यक मार्गदर्शन, उत्पादनवाढ आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करता येतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच बदलत्या ग्राहकांच्या गरजा आणि बाजारपेठेतील स्पर्धा लक्षात घेता खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची गुणवत्ता सुधारणे, आकर्षक पॅकेजिंग व नावीन्यपूर्ण डिझाईनचा अवलंब करणे आणि डिजिटल माध्यमांतून विक्रीला चालना देणे महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रभावी विपणनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्थानिक उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासह ग्रामीण उद्योजकांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असा विश्वासही साठे यांनी व्यक्त केला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages