महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा उद्यापासून बार्शीत
छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाकडे स्पर्धेचे यजमान पद
यंदापासून महिला फुटबॉलसह रस्सीखेच व वुशु या खेळांचा समावेश
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेस बुद्धिबळ स्पर्धेने सुरुवात झाली असून टेबल टेनिस स्पर्धा 15 सप्टेंबरपासून बार्शीत सुरू होतील.
छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या समन्वयाने आयोजित या क्रीडा स्पर्धांमध्ये विविध ३४ क्रीडा प्रकारांचा समावेश असून या स्पर्धा २२ जानेवारी २०२७ पर्यंत विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयाच्या वतीने पार पडणार आहेत. या स्पर्धेच्या नियोजनाची बैठक छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात झाली. या बैठकीत सन २०२६-२७ च्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. या वर्षापासून महिला फुटबॉल, रस्सीखेच आणि वुशु या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी प्रा. संतोष गवळी यांना सेवा निवृत्तीनिमित्त, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य म्हणून निवडलेले डॉ. किरण चौगुले तसेच डॉ.जगदीश चेडे व डॉ. शरण वांगी यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल, मावळते क्रीडा परिषदेचे सचिव प्रा. विशाल होनमाने, ज्येष्ठ सदस्य प्रा. डॉ. सुरेश लांडगे व डॉ. किरण चोकाककर यांना संस्था अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
क्रीडा परिषदेचे चेअरमन म्हणून चेअरमन म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितिन मोटे व सचिव म्हणून प्रा. संतोष गवळी हे काम पाहणार आहेत. यावेळी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे, संस्थेचे सचिव महेश माने, सदस्य डॉ. सुरेश पवार, प्राचार्य शिरीष भोसले, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.
आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक :
टेबल टेनिस| १५, १६ सप्टेंबर | कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी. मल्लखांब | २१ सप्टेंबर | के.एन. भिसे महाविद्यालय, कुर्डुवाडी.
बास्केटबॉल | २३, २४ सप्टेंबर | सांगोला महाविद्यालय. बेस बॉल | २६, २७ सप्टेंबर | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय.
क्रॉस कंट्री | १ ऑक्टोबर | विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, टेंभुर्णी. बॉक्सिंग | ३, ४ ऑक्टोबर | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय. क्रिकेट | ४ ऑक्टोबर | के.बी.पी. महाविद्यालय, पंढरपूर.
कबड्डी | ५, ६, ७ ऑक्टोबर | डी.एच.बी. सोनी महाविद्यालय. बॅडमिंटन | ९, १०, ११ ऑक्टोबर | डॉ. गणपतराव देशमूख महाविद्यालय, सांगोला. लॉन टेनिस | १२ ऑक्टोबर | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय. व्हॉलीबॉल | १३, १४, १५ ऑक्टोबर | कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी.
ज्युडो | १७ ऑक्टोबर | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय. फेन्सिंग | १९ ऑक्टोबर | एस.बी.पी. महाविद्यालय, मंद्रूप. तिरंदाजी | २१ ऑक्टोबर | एम.एच.एम. महाडिक महाविद्यालय, मोडनिंब. खो-खो | २२, २३, २४ ऑक्टोबर | श्री. सुशिलकुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय. कुस्ती | २६, २७ ऑक्टोबर | एस.एम.एस.एम.पी. महाविद्यालय, नातेपुते. ॲथलेटिक्स | २९, ३०, ३१ ऑक्टोबर | के.बी.पी. महाविद्यालय, पंढरपूर. तायक्वांदो | २ नोव्हेंबर | उमा महाविद्यालय, पंढरपूर. हँडबॉल | ४, ५ नोव्हेंबर | संगमेश्वर महाविद्यालय. जलतरण व डायव्हिंग | २६ नोव्हेंबर | संगमेश्वर रात्र महाविद्यालय. फुटबॉल | २७, २८ नोव्हेंबर | एच.एन. कॉलेज ऑफ कॉमर्स. कराटे | ३० नोव्हेंबर | दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय, मंगळवेढा. हॉकी | १, २ डिसेंबर | एस.एस.ए. सोशल कॉलेज. सॉफ्टबॉल | ५, ६ डिसेंबर | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय. वेटलिफ्टिंग आणि बेस्ट फिजीक | ९ डिसेंबर | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय. पॉवरलिफ्टिंग | १४ डिसेंबर | कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा.
गतका | १६ डिसेंबर | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय. योगासन | २२ डिसेंबर | माऊली महाविद्यालय, वडाळा. रायफल व पिस्तूल शूटिंग | २८ डिसेंबर | संगमेश्वर महाविद्यालय. टेनिस व्हॉलीबॉल | ४ जानेवारी २०२७ | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय. शूटिंग व्हॉलीबॉल | ११ जानेवारी २०२७ | छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय. वूशू| २० जानेवारी २०२७ | राजश्री शाहू लॉ कॉलेज, बार्शी. टग ऑफ वॉर | २२ जानेवारी २०२७ | संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा.

No comments:
Post a Comment