सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव कॅम्पसमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 17, 2026

सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव कॅम्पसमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत

 सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव कॅम्पसमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत






सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव सोलापूर कॅम्पसमध्ये गणेशोत्सवानिमित्त उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये कला, संस्कृती, सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि संघभावना रुजविण्याच्या उद्देशाने कॅम्पसमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मनोरंजनात्मक तसेच सांस्कृतिक उपक्रमांचीही आखणी करण्यात आली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरले आहे ते हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध केदारेश्वर मंदिराचा भव्य देखावा. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून साकारण्यात आलेल्या या देखाव्यात हरिश्चंद्रगडाचा निसर्गरम्य परिसर, ऐतिहासिक वास्तू आणि केदारेश्वर मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना साकारण्यात आली आहे. त्यामुळे कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि अभ्यागतांचे या देखाव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

हा देखावा साकारण्यासाठी आदित्य नागणे, शुभम नागणे, राहुल माळी, संकेत पवार, विजय भुसे, शंभूराजे साठे, प्राजक्ता सोनटक्के, क्रांती मानसपुरे, श्रुती भोसले आणि नूतन जाधव या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या कल्पकता, कलाकौशल्य आणि संघभावनेतून केदारेश्वर मंदिर–हरिश्चंद्रगडाचा देखणा आविष्कार कॅम्पसमध्ये साकारला आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि सामाजिक व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम ठरावा, या उद्देशाने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या केगाव कॅम्पसमध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यावर संस्थेचा भर राहणार आहे.


गणेश प्रतिष्ठापनेनंतर कॅम्पसमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनीही गणेशोत्सवाच्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages