साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे पुरस्कार जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून रविवार, दिनांक 27 सप्टेंबर रोजी वालचंद कॉलेज समोरील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे संचालक सुनील चव्हाण यांनी दिली.
पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा
उपक्रमशील मुख्याध्यापिका-- ज्ञानेश्वरी संगीतराव (मुख्याध्यापिका, बापूजी प्राथमिक शाळा)
गुणवंत शिक्षक पुरस्कार--- सुगंधा कांबळे, (गौतम विद्यालय ),प्राजक्ता भोसले, सुरवसे प्राथमिक शाळा), संगीता फडतरे, (पंचशील प्राथमिक शाळा )उषा शिरसागर, (श्री बसवेश्वर मराठी प्राथमिक शाळा), सपना पावाडे, (कै.
राजेश कोठे
प्राथमिक शाळा)
सेवाभावी सेवक --बलराज धजाल (शारदा स्कूल )
आदर्श शाळा ज्ञानगंगा प्राथमिक मराठी विद्यालय.
सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन या पुरस्कारा प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.
प्रशासनाधिकारी मल्हारी माने, वेतन पथक अधीक्षक भरत कासले राजशेखर शिवदारे शंकर चौगुले संजय साळुंखे नरेंद्र गंभीरे मनीष बांगर राजेंद्र कुलकर्णी चंद्रकांत अवताडे गुलाब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे
या कार्यक्रमास सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन उल्हास बिराजदार, सचिव आप्पाराव इटेकर, व्हाईस चेअरमन फरजाना रचभरे, महादेवी पाटील वीरभद्र यादवाड, विनोद आगलावे, भीमराया कापसे, मुरलीधर कडलासकर सचिन चौधरी, भाऊसाहेब मोरे, धनाजी मोरे, शिवानंद हिरेमठ व जयंत गायकवाड यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment