अनगरच्या मुलींची रग्बीमध्ये बाजी; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड
अनगर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा क्रीडा परिषद आयोजित सोलापूर जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धा टेंभुर्णी येथील शारदे गुरुकुल येथे पार पडल्या. या स्पर्धेत कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अनगरच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे अनगरच्या संघाची पुणे विभागीय रग्बी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अनगरच्या संघाचा सामना संत सावता माळी विद्यालय, अरण येथील संघाविरुद्ध झाला. या सामन्यात अनगरच्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळविला.
या यशस्वी संघात श्रावंती शंकर बिस्वास, ईश्वरी जयराम शिंदे, प्रणिती सुनील रणदिवे, श्रावणी रणजीत थिटे, समृद्धी महादेव कापसे, संजीवनी दादाराव थिटे, मानसी तुळसीदास गरगडे, कशिश जयकुमार शिंगटे, श्रुती मारुती करंडे, ऋतुजा दत्तात्रय शिंदे, वैभवी मारुती वराळे व प्रियंका सोमनाथ लोंढे यांचा समावेश आहे.
या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक दाजी गुंड, रवींद्र बोडके, हरिदास शिंदे व पंढरीनाथ थिटे यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीअनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य महादेव चोपडे, उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, क्रीडाशिक्षक चंद्रकांत सरक, विलास गुंड, अर्चना गुंड, पंढरीनाथ थिटे, हरिदास शिंदे आदी उपस्थित होते.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment