सोलापूरात दुधाचे दर ५ ते १० रुपयांनी वाढले; उत्पादन घटल्याचा परिणाम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2026

सोलापूरात दुधाचे दर ५ ते १० रुपयांनी वाढले; उत्पादन घटल्याचा परिणाम

 सोलापूरात दुधाचे दर ५ ते १० रुपयांनी वाढले; उत्पादन घटल्याचा परिणाम


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साधारणपणे पावसाळ्यात चारा मुबलक उपलब्ध झाल्याने दूध उत्पादन वाढते आणि दरात काहीशी घट होते. मात्र, यंदा सोलापूर जिल्ह्यात चित्र वेगळे असून दुधाच्या दरात प्रति लिटर ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या म्हशीच्या दुधाला ६० रुपये, तर गायीच्या दुधाला ५० रुपये प्रति लिटर दर मिळत आहे.

दरवर्षी जुलै ते जानेवारी या कालावधीत दूध उत्पादन वाढल्याने दुधाचे दर उन्हाळ्याच्या तुलनेत कमी असतात. मात्र, यंदा दूध संकलनात घट झाली आहे. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे कृत्रिम आणि भेसळयुक्त दूध विक्रीवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचा दावा करण्यात येत आहे. परिणामी बाजारातील उपलब्ध दूध आणि मागणी यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. दूध संकलनात घट झाल्याने प्रक्रिया उद्योगांना दुधाचा तुटवडा जाणवत आहे. इतर जिल्ह्यांमध्येही दूध संकलनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे सणासुदीच्या काळात दूध पावडर, पेढा आणि खवा यांची मागणी वाढल्याने खासगी दूध संघांकडून दूध खरेदीचे दर वाढविण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages