जिल्हा न्यायालयात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 21, 2026

जिल्हा न्यायालयात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 जिल्हा न्यायालयात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव अमोल देशपांडे व धर्मादाय उपआयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरात यशोधरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत ९०, तर अश्विनी हॉस्पिटलमार्फत ४१ अशा एकूण १३१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच अश्विनी ब्लड बँकेमार्फत ८१, तर डॉ. हेगडेवार ब्लड बँकेमार्फत ३८ अशा एकूण १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
न्यायाधीश वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, धर्मादाय उपआयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रक्तदान व आरोग्य तपासणीचा एकत्रित विचार करता एकूण २५० जणांनी शिबिराचा लाभ घेतला.
रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असून एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. या उद्देशाने आयोजित शिबिरातून “रक्तदान करा... आरोग्यदायी समाज घडवा” हा सामाजिक संदेश देण्यात आला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर, धर्मादाय उपआयुक्त कार्यालय, सोलापूर, अश्विनी हॉस्पिटल, यशोधरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अश्विनी ब्लड बँक व डॉ. हेगडेवार ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages