डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराची गरज- मल्लिनाथ कल्याणशेट्टी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 21, 2026

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराची गरज- मल्लिनाथ कल्याणशेट्टी

 डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराची गरज- मल्लिनाथ कल्याणशेट्टी


अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात परिवर्तन झाले आहे, असे असून देखील अंधश्रद्धा, अफवा आणि अवैज्ञानिक समजुती मुळे समाजाची अवस्था दिशाहीन झाली आहे. अशा स्थितीत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांची गरज आहे असे मत मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विज्ञान विद्याशाखा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, पुनम कोकळगी, रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी  उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, आजचा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस ज्येष्ठ समाजसुधारक डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाळला जातो. आपल्याला “प्रश्न विचारा, पुरावा तपासा आणि सत्य स्वीकारा” हा संदेश त्यांनी दिला  वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारा समाज अधिक प्रगत, विवेकी आणि सक्षम बनतो. असेही त्यांनी सांगितले. म्हणूनच अंधश्रद्धामुक्त आणि प्रगत भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्राध्यापिका डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी केले, आभार प्राध्यापक सौरभ भस्मे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा विद्याश्री वाले, प्रा विद्या बिराजदार, प्रा हर्षदा गायकवाड, प्रा भीम सोनकांबळे, प्रा जनाबाई चौधरी, डॉ बाळासाहेब पाटील, प्रा सोनाली कटकधोंड, प्रा प्राची गणेचारी उपस्थित होते.

चौकट

डॉ नरेंद्र दाभोळकर यांचे विवेकवादी कार्य उल्लेखनीय

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा यांना तिलांजली मिळावी म्हणून आयुष्यभर प्रयत्न केले, त्यांनी विवेक वाहिनी ही  वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारी संघटना कार्यान्वित केली. त्यामुळे विज्ञान व तर्क यांना महत्त्व प्राप्त झाले हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन पुनम कोकळगी यांनी केले.

चौकट
वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

1 रूढी परंपरा अंधश्रद्धा नाहीशा करण्यासाठी प्रयत्न करेन
2 भोंदू बाबा च्या आहारी जाणार नाही
3 समाजामध्ये अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी  प्रयत्न करेन
4 विवेक वादी दृष्टिकोन स्वीकारेन
5 वैज्ञानिक जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात यासाठी समाजाचे प्रबोधन  करेन
6 स्वातंत्र्य, समता, बंधुता धर्मनिरपेक्षता या संविधानिक मूल्यावर निष्ठा ठेवेन

अशी शपथ राष्ट्रीय वैज्ञानिक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी घेतली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages