जैन गुरुकुलच्या गाईड्सनी पाठविली सैनिकांसाठी राखी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत सैनिकांसाठी पाठविण्यात येणारी पर्यावरणपूरक राखी कार्यशाळा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी रमाकांत शिवशरण, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. ८वीतील गाईड औदुंबरी पोतदार हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर गाईड भावना पवार हिने अतिथींचा परिचय करून दिला. यावेळी रमाकांत शिवशरण यांनी विद्यार्थ्यांना रेशीम धागा, लोकर व कागद यांच्यासाह्याने पर्यावरणपूरक राखी तयार करण्यासाठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी गाईडस्नी भारतीय सैनिकांसाठी रक्षासंदेश पाठवून सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यशाळेत सरस्वती गाईड पथकातील ८० गाईडस्नी राखी तयार करण्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार काळे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे कौतुक करत या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरस्वती गाईड पथक प्रमुख तृप्ती माणिकशेटे, लोहिया शहा व कलाशिक्षक अरविंद गोटीमुकूल यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी कदम हिने केले तर नम्रता गुढे हिने उपस्थितांचे आभार मानले.
.png)
No comments:
Post a Comment