कुर्डूवाडी आगारात ‘राजमाता जिजाऊ’ पाच नव्या बसेसचे लोकार्पण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 29, 2026

कुर्डूवाडी आगारात ‘राजमाता जिजाऊ’ पाच नव्या बसेसचे लोकार्पण

 कुर्डूवाडी आगारात ‘राजमाता जिजाऊ’ पाच नव्या बसेसचे लोकार्पण

आ. अभिजीत पाटील व आ. नारायण पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश



कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- कुर्डूवाडी एस.टी. आगारातील जुन्या व अपुऱ्या बसगाड्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत आमदार अभिजीत आबा पाटील यांनी परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार नारायण आबा पाटील यांनीही यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याने या सामूहिक पाठपुराव्याला यश आले असून, कुर्डूवाडी आगारात ‘राजमाता जिजाऊ’ नावाच्या पाच नव्या एस.टी. बसगाड्यांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या नव्या बसगाड्यांच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिक, प्रवासी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या बसगाड्यांचे आगारात आगमन होताच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्वसामान्य प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून केलेला पाठपुरावा सार्थकी लागल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
नवीन बसगाड्यांमुळे दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना अधिक नियमित, सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह एस.टी. सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, प्रवाशांची गरज लक्षात घेऊन भविष्यात बसफेऱ्यांमध्येही वाढ करता येणार आहे.
कुर्डूवाडी आगाराच्या विकासासाठी तसेच प्रवाशांना चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही आमदारांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते राजाभाऊ चवरे, हंबीरराव गोरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. आरती ओंकार बसवंती, संगीता ताई वरपे, तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख रंजना शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक नंदकुमारजी मोरे, युवासेना शहरप्रमुख सागर कोले, पालक अधिकारी कौलगे साहेब, कुर्डूवाडी आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड साहेब,वाहतूक निरीक्षक मंगेश दहीहंडी साहेब, आगार लेखाकार राजू नवले, कामगार सचिव प्रशांत देशमुख, संदीप शिंदे तसेच कर्मचारी वर्ग, कामगार संघटना व कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुर्डूवाडी आगाराला मिळालेल्या या पाच नव्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत महत्त्वाची भर ठरणार असून, ‘प्रवासी हित प्रथम’ या भावनेतून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages