सोलापूर महानगरपालिकेच्या ३५.५० कोटींच्या ठेवी एयू बँकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2026

सोलापूर महानगरपालिकेच्या ३५.५० कोटींच्या ठेवी एयू बँकेत

 सोलापूर महानगरपालिकेच्या ३५.५० कोटींच्या ठेवी एयू बँके



७.२०% व्याजदरामुळे निर्णयाला मंजुरी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, जीएसटी अनुदान आणि डीसीपीएस निधीची एकूण ३५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत मुदतठेवीत गुंतविण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या रकमेवर वार्षिक ७.२० टक्के सर्वाधिक व्याजदर मिळणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी दिली.
महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी सायंकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत रस्ते, पाणीपुरवठा, निधी गुंतवणूक आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित पाच विषयांना मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे १८ कोटी, जीएसटी अनुदानाचे १० कोटी आणि डीसीपीएस निधीचे ७ कोटी ५० लाख, अशी एकूण ३५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम मुदतठेवीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुदतठेवीसाठी महापालिकेने संकेतस्थळावर जाहीर प्रसिद्धी देऊन राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांकडून ई-मेलद्वारे व्याजदर मागविले होते. प्राप्त दरपत्रकांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेने ७.२० टक्के वार्षिक व्याजदर देऊ केला. सर्वाधिक व्याजदर असल्याने या बँकेत रक्कम गुंतविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. हे प्रकरण महापालिका आयुक्तांकडून स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.
रस्ते काँक्रीटीकरणालाही मंजुरी
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक २२ मधील लहान इरण्णा वस्ती आणि लिमयेवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ५ मधील चार ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली.
पाणी पाइपलाइनच्या कामाची माहिती
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानाच्या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधील राजेंद्र चौक, बंडा घर ते कदम घर आणि परिसरात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी १७ जुलै २०२६ रोजी देण्यात आलेल्या वर्कऑर्डरची माहिती सभेत घेण्यात आली.
महापालिकेच्या विविध निधींच्या गुंतवणुकीसोबतच शहरातील रस्ते आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांनाही स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याचे सभापती रंजिता चाकोते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages