सिंहगड महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कॉलेज प्रेसिडेंटपदी नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2026

सिंहगड महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कॉलेज प्रेसिडेंटपदी नियुक्ती

 सिंहगड महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कॉलेज प्रेसिडेंटपदी नियुक्ती


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जयंत स्पंदन फाउंडेशनतर्फे एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव येथील साकेत कोमल स्नेहदीप कांबळे आणि अक्षता अमृता अनिल कुलकर्णी यांची कॉलेज प्रेसिडेंट (महाविद्यालयीन अध्यक्ष) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जयंत स्पंदन फाउंडेशनच्या वतीने ३० जुलै २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन दोन्ही विद्यार्थ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविद्यालयात फाउंडेशनच्या विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी तसेच युवकांना सामाजिक कार्याशी जोडण्यासाठी दोन्ही कॉलेज प्रेसिडेंट महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक कार्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

साकेत कांबळे आणि अक्षता कुलकर्णी यांच्या नेतृत्वगुण, सामाजिक कार्यातील सहभाग, समर्पण आणि कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत फाउंडेशनने त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या नियुक्तीबद्दल जयंत स्पंदन फाउंडेशनचे सोलापूर जिल्हा समन्वयक शुभमराज त्रिशला बाळासाहेब करंडे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या माध्यमातून महाविद्यालयात फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages