अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न; विकासकामांवर सकारात्मक निर्णय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2026

अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न; विकासकामांवर सकारात्मक निर्णय

 अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न; विकासकामांवर सकारात्मक निर्णय


अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहात पार पडली. सभेत शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले.
बसस्थानक परिसरातील आयलँडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, शहर विकास आराखडा, विविध विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, वृक्षसंवर्धन तसेच वार्षिक निविदांसह नागरिकांशी संबंधित विविध विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महिला व बालकल्याण तसेच दिव्यांगांसाठी राखीव निधीचा योग्य वापर करून लोकहिताची कामे करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले.
दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून अक्कलकोटसाठी श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर मंजूर झाल्याबद्दल तसेच प्रधानमंत्री आवास योजना–शहरीअंतर्गत केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी १,००० पक्की घरे उभारण्याचा गृहप्रकल्प मार्गी लागणार असल्याबद्दल सभेत अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला. या कामांसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे अभिनंदन करण्यात आले.
अक्कलकोट शहराच्या विकासाला गती देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकहिताचे निर्णय घेण्याची विकासयात्रा पुढेही सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सभेस मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, पक्षनेता यशवंत घोंगडे, विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages