अनगरच्या क.महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2026

अनगरच्या क.महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान

 अनगरच्या क.महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान

अनगर (कटूसत्य वृत्त):- येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात आले. यावेळी सोलापूर येथील ब्रह्मकुमारी लाईट हाऊसचे बाळू परबत यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना बाळू परबत म्हणाले, “शारीरिक व्यसनांबरोबरच मानसिक व्यसनही अत्यंत घातक आहे. मोबाईलचे व्यसन, मोटारसायकलचे व्यसन यामुळेही आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी.”
“गुटखा-मावा खाणार नाही, इतरांनाही खाऊ देणार नाही,” असा निर्धार विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांना सामूहिक शपथही देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य महादेव चोपडे होते. यावेळी उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, रमेश खाडे, एफ. एस. पुजारी, महादेव चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कला विभागप्रमुख रमेश चव्हाण, गोरख गायकवाड, सत्यवान कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पांडुरंग शिंदे, सोमनाथ ढोले, दाजी गुंड, बापूराव घुले, डॉ. प्रशांत कुलकर्णी, झाकीर मुलानी, आनंद आदलिंगे, परमेश्वर कुंभार, अर्चना गुंड, शमा काझी, गणेश उघडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले, तर पांडुरंग शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages