सदोष मनुष्य वध प्रकरणी क्रिकेट कोच ला उच्च न्यायालयात जामीन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 24, 2026

सदोष मनुष्य वध प्रकरणी क्रिकेट कोच ला उच्च न्यायालयात जामीन

 सदोष मनुष्य वध प्रकरणी क्रिकेट कोच ला उच्च न्यायालयात जामीन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बार्शी येथील क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या युवा क्रिकेट शिबिरामध्ये शिबिरार्थीला लोखंडी रोलर ओढायला लावुन त्याच्या मृत्युस कारणीभुत झाल्याचा सदोष मनुष्य वध प्रकरणी अटक करण्यात आलेल्या क्रिकेट कोच विवेक गजेंद्र दुगन याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुर सर्कीट बेंच समोर होऊन न्यायमुर्तींनी क्रिकेट कोच विवेक गजेंद्र दुगन यांची जामिनावर मुक्तता केली. सदरचा दुर्दैवी प्रकार बार्शी येथील बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये घडला होता.

या प्रकरणी बार्शी शहर पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. क्रिकेट कोच दुगन यांनी शिबिरार्थी ला लोखंडी रोलर ओढावयास लावला होता. त्या रोलरखाली शिबिरार्थी येऊन त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी क्रिकेट कोच दुगन यास अटक झाली होती. त्याचा जामीन अर्ज बार्शी कोर्टाने फेटाळला होता.

सदर निकालाविरुध्द क्रिकेट कोच दुगन याचेतर्फे ॲड जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापुर सर्कीट बेंच येथे जामीन अर्ज दाखल केला होता. घडलेली घटना दुर्दैवी व अपघाती आहे. सदर प्रकरणी दाखल झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा चुकीच्या गृहीताखाली दाखल झालेला आहे असा युक्तिवाद ॲड जयदीप माने यांनी केला.

याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने ,ॲड. मिहीर मोंडकर यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. महालक्ष्मी गणपती यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages