ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 16, 2026

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार

 -बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार

                                                                                                                         - पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे : सोलापूरच्या जनतेला दिलेले प्रत्येक शब्द पूर्ण करणार







सोलापूर,(कटूसत्य वृत्त): सोलापूर शहरातील  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी -बसेसचा विषयही मार्गी लागला आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर शहरासाठी 100  - सिटी बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी 4 बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. आणखी 16 बसेस लवकरच पोहोचत असून पहिल्या टप्प्यात एकूण 20 -बसेस शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास  पंचायतराज मत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

         सोलापूर शहरातील एक्झिबिशन सेंटर इथे महापालिकेस कडे आलेल्या चार  बसेसचे उद्घाटन फीत कापून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होतेयावेळी आमदार देवेंद्र कोठेमहापौर विनायक कोंड्यालउपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरमहापालिका आयुक्त सचिन ओंबासेनगरसेविका रोहिणी तडवळकर त्यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

        यावेळी पालकमंत्री श्रीगोरे म्हणाले कीशहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेतस्वच्छतेच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मालकीच्या 4 स्वीपींग मशीन उपलब्ध झाल्या आहेतत्यांच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जाईलतसेच सोलापूरच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेतविमानसेवेपासून ते बी-2 च्या महत्वाच्या प्रश्नापर्यंत अनेक रखडलेले विषय आता मार्गी लागले आहेतशहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा उड्डाणपुलाचा प्रश्नही विशेष होतात्यासाठी 93 टक्के जमीन आपल्या ताब्यात आली असून त्याचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होईलअसे त्यांनी म्हटले.

         सोलापूरच्या जनतेसाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जो जो शब्द आम्ही दिला होता त्या पूर्तीच्या दिशेने आम्ही चाललो आहोतअसे सांगून पालकमंत्री गोरे यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages