सहकार शिरोमणी सहयोगी ओंकार शुगर कारखाना कार्यस्थळावर 80 वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 16, 2026

सहकार शिरोमणी सहयोगी ओंकार शुगर कारखाना कार्यस्थळावर 80 वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

 सहकार शिरोमणी सहयोगी ओंकार शुगर कारखाना कार्यस्थळावर 80 वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा



 



भाळवणी (कटूसत्य वृत्त):- सहकार शिरोमणी वसंतराव काळेसह.साखर कारखाना कार्यस्थळावर देशाचा 80 वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव वसंतराव काळेसाहेब यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजास राष्ट्रगीतासह सलामी दिली. तदनंतर सुरक्षा जवानांची परेड सादर करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर आर.आर.साळुंखे यांनी मानले.   

तसेच कारखाना कार्यस्थळावरील वसंतराव काळे विद्यामंदिर शाळेमध्ये कारखान्याचे संचालक मा.श्री.आण्णा गोरख शिंदे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतुन देशभक्तीपर मनोगत व्यक्त करुन, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीर जवान, क्रांतीकारकांच्या आठवणींना उजाळा दिला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे साहेब यांनी शाळेच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या देशभक्तीपर भाषणांचे कौतुक करुन छोट्या मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन बक्षिसही देण्यात आले. आपल्या देशावरील इं‌ग्रजांची हुकुमशाही राजवट मोडुन सुशासन येण्यासाठी अनेक देशप्रेमी महात्मे, क्रांतीकारी, वीर जवान यांनी केलेल्या त्यागाची, बलिदानांची जाणीव सर्वांनी ठेवावी असेही सांगुन सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांचे शुभहस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

  याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक सर्वश्री मोहन नागटिळक, जयसिंह देशमुख, सुनिल सराटे, अमोल माने, अरुण नलवडे, राजाराम जगदाळे, सुरेश देठे  माजी संचालक प्रताप म्हेत्रे, इस्माईल मुलाणी सर्व खातेप्रमुख, उपखाते प्रमुख, परिसरातील नागरीक, कारखान्याचे कर्मचारी, सभासद, तोडणी वाहतुक ठेकेदार, तसेच शाळेचे सचिव हणमंत जमदाडे, मुख्याध्यापक एस.एल.काळे, शिक्षक, पालक, विद्यार्थी  आदि मोठया संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages