महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात स्वांतत्र्य दिन उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 16, 2026

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात स्वांतत्र्य दिन उत्साहात संपन्न

 महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठात  स्वांतत्र्य   दिन उत्साहात संपन्न





नाशिक (कटूसत्य वृत्त): - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये 80 वा स्वांतत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांच्या हस्ते विद्यापीठ प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आहे. यावेळी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, डॉ. संदीप कडू, श्री. बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, आरोग्य सेवा व संशोधन हा विद्यापीठाचा गाभा आहे. प्रशासकीय कामाजात पारदर्शकता यावी यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यापीठात आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटलायझेशनचा वापर वाढवण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. रुग्णसेवा आणि शिक्षणाशी जोडलेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांत उच्च दर्जाची आरोग्य शिक्षण व सेवा पोहोचवणे महत्वपूर्ण आहे. विद्यापीठाला देशात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी कामकाजात पारदर्शकता हाच एकमेव मार्ग आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच वेळेवर पगार, पदोन्नती, योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षित कामाचे वातावरण आवश्यक आहे. विकसित आणि निरोगी राष्ट्रासाठी सर्वांनी सकारात्मतेने काम करावे. स्वातंत्र्यलढ्यात प्राणांचे बलिदान देणाÚया हुतात्म्यांना मी विनम्र अभिवादन करतो असे त्यंानी संागितले.
  यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत व ‘जय जय महाराष्ट्र माझा‘ हे राज्यगीत घेण्यात आले. यावेळी शासनाने निर्देशित केल्यानुसार कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा व लैगिंक छळ प्रतिबंध अधिनियमानुसार प्रतिज्ञा घेतली. यावेळी महाराष्ट्र वैद्यकीय पद्व्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेचे डॉ. गोपळ शिंदे यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  कर्मचाऱ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages