लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शनिवारी पत्रा तालीम येथील कै. मुरलीधरजी घाडगे पैलवान सभागृहात सायंकाळी ७ वाजता लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत सन २०२६-२७ या वर्षासाठी महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड दत्ता भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
यावेळी उत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी गिरीष शेंगार व दादा सुरवसे, कार्याध्यक्षपदी महेश धाराशिवकर, सचिवपदी ओंकार जाधव, खजिनदारपदी प्रवीण जाधव, मिरवणूक प्रमुखपदी राजू हुंडेकरी, प्रसिद्धी प्रमुखपदी वैभव गंगणे व बसवराज कोळी, तर कार्यालयीन प्रमुखपदी सचिन स्वामी यांची निवड करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीस मानाचा पणजोबा गणपती तसेच पत्रा तालीमचे आधारवड कै. मुरलीधरजी घाडगे पैलवान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बैठकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” अशा जयघोषाने परिसर दणाणून सोडला.
यावेळी खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर,माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव, श्रीकांत घाडगे, बाळासाहेब पुणेकर, बापू जाधव,मनोज गादेकर, अंबादास शेळके, सुहास कोलारकर, राजेंद्र घुले, महादेव गवळी, लहू गायकवाड, दीपक उर्फ पिंटू चव्हाण, राहुल (बाबू) बनसोडे, निशांत सावळे, प्रवीण उर्फ पिंटू इरकशेट्टी, शंतनु साळुंखे, पत्रा तालीम उत्सव अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष सार्थक साखरे, आदित्य घाडगे, यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे आगामी गणेशोत्सव अधिक उत्साहात, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी महामंडळाच्या कामकाजाला आता वेग येणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या बैठकी प्रसंगी किशोर गादेकर, प्रा.ओंकार भुरळे, एडवोकेट मल्हार बन्ने,राजाभाऊ सुरवसे, प्रसन्न गायकवाड, सौरभ कन्हेरी, महेश हजारे, चन्नेश इंडी सर, जितेश भुरळे, बसवराज गुब्याड, ज्ञानेश्वर बनसोडे , सोमनाथ बनसोडे यांची उपस्थिती होती.
बैठकीची प्रस्तावना प्रा.ओंकार भुरळे यांनी केली तर आभार प्रदर्शन सचिन स्वामी यांनी मानले.
.jpg)
No comments:
Post a Comment