बबन दादा शिंदे यांचे एक सप्टेंबर रोजी माढा तालुक्यात आगमन भव्य स्वागत : समारंभाची जैय्यत तयारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

बबन दादा शिंदे यांचे एक सप्टेंबर रोजी माढा तालुक्यात आगमन भव्य स्वागत : समारंभाची जैय्यत तयारी

 बबन दादा शिंदे यांचे एक सप्टेंबर रोजी माढा तालुक्यात आगमन भव्य स्वागत :  समारंभाची जैय्यत तयारी







  नागरिकांनी'सोशल डिस्टन्स'चे नियम पाळावे-
               विक्रमसिंह शिंदे  
 
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे  हे अमेरिकेत सेंट लुईस येथील बीजेसी हॉस्पिटलमध्ये एक वर्षांपूर्वी हृदय प्रत्यारोपणाची( हार्ट ट्रान्सप्लांटेशन )शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर 26 रोजी आपल्या जन्म आणि कर्मभूमी असलेल्या माढा तालुक्यात येणार असून याच दिवशी त्यांचे  स्वागत आणि 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे .यासाठी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर , जिल्ह्यातील सर्व आजी माजी विधानसभा व विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका व सहकारी संस्थांचे  पदाधिकारी व सदस्य  यांचे सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या भव्य प्रांगणात हा सोहळा संपन्न होणार असून बबन दादांच्या स्वागताची व होणाऱ्या समारंभाची जैय्यत  तयारी करण्यात आली असल्याचे माजी सभापती विक्रम सिंह शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, माजी सभापती शिवाजी कांबळे, पंचायत समिती सदस्य धनाजी जवळगे, मार्केट कमिटीचे संचालक रमेश पाटील, दिलीपराव भोसले, कारखाना संचालक संदीप पाटील प्रा. डॉ. महेंद्र कदम ,नागेश खटके , कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे आदी मान्यवर उपस्थित होते.
       विक्रम सिंह शिंदे म्हणाले की नियोजित कार्यक्रमानुसार बबनदादा शिंदे यांचे मंगळवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुण्याहून भीमानगर(ता.माढा) येथे आगमन होणार असून तेथून ते रांजणी देवाची येथे ओंकारेश्वर चे दर्शनासाठी जाणार आहेत,त्या नंतर आढेगाव पाटी व शिराळ पाटी   येथून   टेंभुर्णी येथील करमाळा चौकातील कार्यकर्त्यांचा सन्मान स्वीकारून ओम शांती भवन येथे दुपारी जेवणासाठी थांबणार आहेत. त्यानंतर साखर कारखाना प्रवेशद्वारावरील सत्कार स्वीकारून दुपारी तीनच्या दरम्यान कारखाना रेस्ट हाऊस ला पोहोचणार आहेत.


चौकट..। 
    ...जेसीबी व हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी...
     विशेष म्हणजे भिमानगर , आढेगाव, शिराळ पाटी व करमाळा चौक येथे भव्य स्वागत कमानी उभ्या केल्या असून या प्रत्येक ठिकाणी बबन दादांच्यावर जेसीबी तून पुष्पवृष्टी तर साखर कारखाना प्रवेशद्वारावर सापटणे( टे.) चे माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड यांचे तर्फे हेलिकॉप्टर मधून दादांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तसेच टेंभुर्णी तील सर्व महापुरुषांना दादांच्या उपस्थितीत कार्यकर्ते पुष्पहार अर्पण करणार आहेत.


चौकट...
       पाच प्रकारच्या 'तुला' करणार..
      दुपारी कारखाना रेस्ट हाऊस येथे बबनदादांच्या  पेढे, फळे, धान्य, कपडे व ग्रंथ- पुस्तके अशा  पाच प्रकारच्या 'तुला' करण्यात येणार आहेत.  सायंकाळी चार वाजता पालकमंत्री नामदार गोरे माजी खासदार निंबाळकर व उपस्थित मान्यवरासह बबन दादांचे व्यासपीठावर आगमन होणार आहे. या ठिकाणी दादांच्या साठी वेगळे स्टेज करण्यात आले असून सोशल डिस्टन्सचे नियम कटाक्षाने पाळण्यात येणार आहेत .   

  चौकट... शालेय साहित्य स्वीकारणार 
 सोशल डिस्टन्स चा काटेकोर वापर  करण्यात येणार असून कोणत्याही नागरिका कडून हार, गुच्छ, शाल, फेटे, बुफे स्वीकारले जाणार नाहीत, यापेक्षा शालोपयोगी वह्या पुस्तके पेन असे साहित्य कार्यकर्त्यामार्फत स्वीकारले जाणार असल्याचे आवर्जून सांगण्यात आले.

 चौकट....
        भव्य मंडपःआकर्षक व्यासपीठ
 विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या  प्रांगणात आकर्षक व्यासपीठ व आठ ते दहा हजार नागरिक बसू शकतील असा भव्य मंडप तयार करण्यात आला असून  वेगवेगळे 'कक्ष' तयार करण्यात आले आहेत. या भव्य सोहळ्यानिमित्त बारा ते पंधरा हजार नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आलेली असून वीज ,पाणी, स्वच्छता, वाहनांचे पार्किंग अशा अत्यावश्यक बाबीची पूर्तता  करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजीत शिंदे, विक्रम शिंदे यांचे सहीत  गौरव समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य प्रयत्नशील असून नियोजनानुसार सर्वत्र योग्य ती काळजी घेतली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages