अक्कलकोटमध्ये दुसरे नांदी ग्रंथपाल साहित्य संमेलन संपन्न
अक्कलकोट येथे आयोजित दुसऱ्या नांदी ग्रंथपाल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, पुणे मसापचे कार्यवाह सुनील महाजन, मसाप अक्कलकोट शाखेच्या अध्यक्षा सौ. शैलशिल्पा जाधव, जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, नगरसेविका सौ. सोनाली शिंदे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा तसेच अक्कलकोट तालुक्यात मोठ्या संख्येने ग्रंथालये आहेत. त्यामुळे दुसरे नांदी ग्रंथपाल साहित्य संमेलन अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आले. सीमावर्ती भागात मराठी भाषेचा अधिकाधिक प्रसार होणे गरजेचे आहे, असे मत मसाप अक्कलकोट शाखेच्या अध्यक्षा सौ. शैलशिल्पा जाधव यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले.
दरम्यान, २०२८ मध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अक्कलकोट येथेच घेण्यात यावे. हे संमेलन आयोजित करण्यासाठी आपण तयार आहोत, अशी जोरदार मागणी स्वागताध्यक्ष महेश इंगळे यांनी केली. नांदी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रंथपालांचे साहित्य संमेलन होत आहे, ही वाचन चळवळीसाठी भूषणावह बाब असल्याचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिका सौ. आरती काळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सोलापूर जिल्ह्यातील शतकोत्तर वाचनालयांच्या ग्रंथपालांचा प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अक्कलकोट शहरात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वामीनाथ हरवाळकर, धनराज भुजबळ, तम्मा शेळके, सचिन घंटे, सौ. सोनाली शिंदे, डॉ. विद्युलता पांढरे, डॉ. मनिषा पाटील, अरविंद शिंदे, यशवंत पाटील आणि जलील पटेल यांचा डॉ. स्वाती महाळंक यांच्या हस्ते पुणे मसापतर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बापुजी निंबाळकर, भीमराव साठे, मुकुंद पत्की, दत्तात्रय बाबर, सौ. पुष्पा हरवाळकर, लक्ष्मण पाटील, प्रशांत शहा, प्राचार्य जेऊरे, सुभाष सुरवसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आरती काळे व राजू भोसले यांनी केले.
.png)
No comments:
Post a Comment