पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी; विद्यार्थिनींनी जपली रक्षाबंधनाची अनोखी परंपरा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 29, 2026

पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी; विद्यार्थिनींनी जपली रक्षाबंधनाची अनोखी परंपरा!

 पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी; विद्यार्थिनींनी जपली रक्षाबंधनाची अनोखी परंपरा!





नातेपुते (कटूसत्य वृत्त):- रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा उत्सव न राहता समाजातील रक्षणकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर संदेश देत नातेपुते येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
विद्यार्थिनींनी नातेपुते पोलीस ठाण्यास भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर तसेच पोलीस कर्मचारी यांना राखी बांधली. यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला मनापासून सलाम केला.समाजाची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बांधव अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या या सेवाभावाची जाणीव ठेवून विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात जाऊन राखी बांधल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमातून ‘रक्षण करणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता’ हा सामाजिक संदेश देण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक संदीप पानसरे, उप मुख्याध्यापक शकूर पटेल, पीआरओ मनोज राऊत, शिक्षिका वर्षा गुळीग यांच्या नियोजनात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, संस्कार, कृतज्ञता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
विद्यार्थिनींच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नातेपुते पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages