जि.प.शाळेतील मुलांनी झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवस्ती शाळेत राखी निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुलामुलींनी निर्मित करण्यात आलेल्या राख्या झाडांना बांधून अनोखी राखी पौर्णिमा साजरी केली.यामध्ये अनेक मुलांनी राखी निर्मिती कार्यशाळेत सहभाग घेतला. “टाकाऊ पासून टिकाऊ “ या संकल्पनेवर आधारित या कार्यशिक्षण उपक्रमात मुलांनी घरातून जुन्या लग्नपत्रिका, मण्याच्या माळा, रंगीत कागद , दोरे, गोंडे आणून त्यांचा उपयोग करून विविध रंगाच्या व आकाराच्या राख्या उत्साहात बनवल्या व नवनिर्मितीचा आनंद घेतला. यासाठी मुख्याध्यापिका जगताप मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर सर्व मुलांनी मिळून परिसरातील झांडांसाठी भली मोठी राखी बनवली. वृक्ष हे आपले सखे सोबती आहेत, त्याच्यामुळे पर्यावरणाचे तसेच आपले रक्षण होते म्हणून त्यांच्याशी आपले नाते घट्ट रहावे या विचारांनी विद्यार्थ्यांनी परिसरातील सर्व झाडांना राख्या बांधल्या त्याचबरोबर वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला यासाठी जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
.png)
No comments:
Post a Comment